Corona-Patient
Corona-Patient 
पुणे

खबरदार! सोसायटीवाल्यांनो, 'त्यांच्या'वर बहिष्कार टाकाल तर...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गृहनिर्माण सोसायटीमधील कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परतल्यानंतर त्यांच्यावर तसेच नातेवाईक, केअरटेकर यांच्यावर बहिष्कार घालण्यात येऊ नये. तसेच, सोसायट्यांनी स्वत:ची वैयक्तिक बंधने लादू नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याबाबत गृहनिर्माण संस्थांकडून स्वत:चे नियम तयार करुन सोसायटीमध्ये बंधने घालण्यात येत असल्याचे निर्दशनास येत आहे. गृहनिर्माण संस्थांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्क लावणे, निर्जंतुकीकरण, सॅनिटाझरचा वापर, साबणाने हात धुणे, वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांची काळजी घेणे तसेच सामाजिक अंतर राखणे, अनावश्यक गर्दी टाळणे या बाबींवर जनजागृती करुन उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमन, सचिव आणि सदस्यांनी सोसायटीमधील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देण्यात यावी, त्यांना कामावर ये-जा करण्याकरिता प्रतिबंध करु नये. सोसायटीमधील अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती, संस्था (प्लंबर, इलेक्ट्रीशियन, गॅस व पाणीपुरवठा करणाऱ्या व्यक्तींना सोसायटीमध्ये प्रतिबंध करु नये.

सोसायट्यांनी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ; दिल्ली न्यायालयाचा गुन्हा नोंद करण्याचा आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

GT vs CSK Live IPL 2024 : चेन्नई प्ले ऑफच्या उंबरठ्यावर तर गुजरात इलिमिनेशन टाळण्यासाठी जोर लावणार

Karnataka Crime: 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न पुढे ढकलल्याने मुलीचं डोकं उडवलं; एक दिवसापूर्वीच झाली होती दहावी पास

SCROLL FOR NEXT