Actor Subodh Bhave express his feelings about Dr Khurjekar death 
पुणे

डॉ. खुर्जेकरांच्या निधनावर सुबोध भावे हळहळला, म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : संचेती रूग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचे काल (ता. 16) अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे डॉ. खुर्जेकर व त्यांचा चालक जागेवरच ठार झाले. त्यांच्या निधनामुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त होत असताना, अभिनेता सुबोध भावेनेही फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या डॉक्टर मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे.  

सुबोधने यापूर्वीही रस्त्यावरील खड्डे, वाहतूकीचे न होणारे पालन, वेडीवाकडी गाडी चालविणे यावर मत व्यक्त केले होते. डॉ. केतन हे सुबोधचे मित्र होते. तर मागच्याच आठवड्यात सुबोधच्या भावाचे अपघाती निधन झाले होते. याच घटनांवर त्याने भावनिक पोस्ट लिहिली आहे व वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर टीका केली आहे.

सुबोध त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो की, 'मागच्या आठवड्यात माझ्या भावाचा आणि काल माझ्या डॉक्टर असलेल्या मित्राचा रस्त्यावरच्या अपघातात जीव गेला.कारण तेच खड्डे,बेशिस्तपणा,निष्काळजीपणा आणि देशाच्या वाहतुकीचे नियम न पाळता जीव घेणारे छुपे दहशतवादी.
विनंती करतो स्वतःवर आणि आपल्या घरच्यांवर प्रेम करत असाल तर गाडी चालवताना नियम पाळा, कारण कोणीतरी तुमची वाट पाहतंय आणि तुमची काळजी करतंय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT