CBSE_Students_SSC_Result_2020
CBSE_Students_SSC_Result_2020 
पुणे

आईनं सांगितला तसा अभ्यास केला अन् बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "परीक्षा अगदी तोंडावर आल्यावर अभ्यास करण्यापेक्षा उन्हाळ्याच्या सुटीपासूनच अभ्यासाला सुरवात कर, असे आईने सांगितले. तिच्या सांगण्यावरून अभ्यासाला सुरवात केली. त्यामुळे परीक्षेदरम्यान अभ्यासाचा ताण आला नाही," अशा शब्दात भुकूम येथील संस्कृती स्कूलच्या अदित लिटके याने आपल्या यशाचे गमक उलगडले. अदितने सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण मिळविले आहेत.

यानिमित्त अदित याच्याशी संवाद साधला असता, त्याने अभ्यास कसा केला हे दिलखुलासपणे सांगितले. तो म्हणाला, "दहावीची नियमित शाळा सूरू होण्यापूर्वीच अभ्यास सुरू केल्याने माझा अभ्यास खूप लवकर संपला, शेवटच्या टप्प्यात मी केवळ सरावाला प्राधान्य दिले. परीक्षेपूर्वी मी दररोज किमान दोन-तीन प्रश्नपत्रिका सोडविण्यावर भर दिला. त्यामुळे परीक्षेचा फारसा ताण आला नाही. सध्या अदित जेईईची तयारी करत असून त्याला संगणक अभियंता व्हायचे आहे आणि जर्मन भाषेचेही शिक्षण घ्यायचे आहे. 

केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागातील ९८.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागातून ७६ हजार ३१५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यातील ७६ हजार १७९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

शहरातील शाळांचा निकाल
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील ७७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि त्यात सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गौतम राजहंस याने ९८.६ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. प्रशालेतील ६४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर संस्कृतमध्ये  १० विद्यार्थ्यांनी, गणितात सात आणि सामाजिक अध्ययनमध्ये पाच विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले आहेत.

निगडी प्राधिकरण येथील सिटी प्राइड स्कूलमधील १०० टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील जवळपास ४१ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. शाळेतील २३ विद्यार्थ्यांनी गणितात, १३ विद्यार्थ्यांनी जर्मनमध्ये, चार जणांनी सामाजिक शास्रात पैकीच्या पैकी गुण पटकाविले आहेत. वेदांत तळेगावकर हा विद्यार्थी ९८.८ टक्के गुण मिळवित शाळेत पहिला आला आहे. तर रिया शहा (९८.६ टक्के) आणि आरव कुंभार (९८.४टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

भुकूम येथील संस्कृती स्कूलमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील अदीत लिटके याने ९९.६० टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला. तर प्रांजल देशमुख हिने ९९ टक्के गुणांसह शाळेत द्वितीय क्रमांक मिळविला. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेत खनक पटवारी हिने ९९.२ टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर सोहम जयभाय याने ९८ टक्के आणि आदिती राव हिने ९७.४ टक्के गुण मिळवित द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे.

विखे पाटील मेमोरियल स्कूल (व्हीपीएमएस) मधील तन्वी काकडे हिने ९८.४ टक्के गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला. तिला मराठी, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. तर सिद्धांत गोळवलकर आणि अभिनव रौंधाल यांनी ९८.२ टक्के गुण मिळविले आहेत.

आर्मी पब्लिक स्कूलमधील ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शाळेतील २२ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा जास्त, तर ८८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. रीदम सूद आणि आदिती बेदरकर यांनी ९८ टक्के गुण, तर एस. मनस्वी हिने ९७.८ टक्के आणि हेमंग झांब ९७.२ टक्के यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले आहेत.

"मला ९९.२ टक्के मिळतील, अशी अपेक्षा केली नव्हती. दहावीच्या अभ्यासासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी खुप प्रोत्साहन दिले. अंतिम परीक्षेसाठी तयारी करताना शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझ्या यशाचे श्रेय हे पालक आणि शिक्षकांचे आहे."
- खनक पटवारी, एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल (९९.२ टक्के)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT