Aditya Thackeray 
पुणे

Pune Traffic : राजकीय पेचानंतर आदित्य ठाकरे अडकले पुण्याच्या वाहतूक कोंडीत

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्याची वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं. याच वाहतूक कोंडीचा फटका आता माजीमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे. शिवसेना पक्ष आधीच राजकीय कोंडीत असताना आदित्य ठाकरे पुण्याच्या कोंडीत अडकल्याचं चित्र आज पुण्यात पाहायला मिळालं.

आदित्य हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा ताफा तब्बल वीस ते पंचवीस मिनिट पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकला होता. वाकडेवाडी परिसरातून आदित्य ठाकरे हे सारसबागेच्या दिशेने जात असताना तब्बल वीस ते पंचवीस मिनिट अडकून पडले होते. शहरात मुसळधार पाऊस आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे आदित्य ठाकरे यांना कार्यक्रमाला जाण्यासाठी देखील उशीर झाला.

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकाची आणि वाहतूक कोंडीची हवाई पाहणी केली. गुरुवारी चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडीत दोन रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या. त्यामुळे या कोंडीवर लवकरात लवकर तोडगा काढवा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT