dedicated hospital.jpg 
पुणे

धक्कादायक : बाणेरमधील डेडीकेटेड रूग्णालय सुरू केल्याचा प्रशासनाचा दावा पण डॅशबोर्डवर मात्र...    

शीतल बर्गे

बालेवाडी (पुणे) : बाणेर येथील सर्व्हे नंबर 109 मधील महापालिकेचे डेडीकेटेड कोरोना रूग्णालय अद्याप सुरू झालेले नाही, याची 'इ सकाळ'वर बातमी प्रसिध्द होताच या रुग्णालयाबाबत माध्यमांसह सर्वत्र चर्चा सुरु झाली  त्यामुळे हे रुग्णालय गुरुवारपासून (ता. 3 सप्टेंबर) सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. परंतु, या ठिकाणी मात्र फक्त आठ रुग्ण सध्या उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेच्यावतीने बाणेर येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. पण उदघाटन होऊन सहा दिवस झाले तरी हे रुग्णालय सुरू न झाल्याने या संदर्भात 'इ सकाळ' वर वृत्त  प्रसिध्द होताच (ता. 3सप्टेंबर )रोजी हे रुग्णालय सुरू केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.  या रुग्णालयांमध्ये एकूण 314 खाटा असून त्यात 270 ऑक्सिजन बेड, 44आयसीयू बेड  आहेत. पण या ठिकाणी मात्र या रुग्णालयाच्या क्षमतेच्या फक्त पाच टक्के ही रुग्ण दाखल करण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, महापालिकेच्या हेल्पलाइनवर विचारणा केली असता पुण्यात कुठेही व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत असे सांगण्यात आले. तर विभागीय आयुक्तालयाच्या वतीने रुग्णांसाठी बेड उपलब्धतेसाठी सुरू केलेल्या डॅशबोर्डवर मात्र आयसोलेशन ऑक्सिजन 10 बेड, व्हेकंट आयसोलेशन ऑक्सिजन 2 बेड, आयसीयू 0 बेड, रेग्युलेटेड   0 बेड,  अलोकेटेड 10 बेड,  अशी माहिती दाखवली जात आहे. तर या रुग्णालयात या संदर्भात चौकशी केली असता कोणतीही माहिती मिळाली नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

फक्त आज आठ रुग्ण भरती केले एवढेच सांगण्यात आले. यावरून प्रशासनाने हे रुग्णालय घाईघाईने सुरू केली आहे हेच सिद्ध झाले आहे. तसेच इथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आले. याची दुसरी बाजू अशी आहे पुणे महानगरपालिकेने यापूर्वी दोन वेळा आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांच्या भरती करण्यासंदर्भात जाहिरात दिली होती,  मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मनुष्य कमतरता भासत आहे. वस्तुतः प्रशासनाच्या वतीने आवश्यक प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र, पात्र उमेदवार अनेक आहेत. परंतु, डॉक्टरांचा अतिशय थंड प्रतिसाद येथे मिळत आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता असल्याचे समोर येत आहे.केवळ  प्रशासनाकडे बोट  दाखवण्या ऐवजी ही सेवा देण्याच्या दृष्टीने पुढे येणे गरजेचे आहे. असेही नागरिक मत व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT