पुणे

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी : अजित पवार

- मिलिंद संगई

बारामती : कोरोनाची (Corona) साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज दिले. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीत पवार यांनी प्रशासनाला हे निर्देश दिले. या बैठकीत पवार यांनी कोरोना(Corona) प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना(Corona) रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. पवार म्हणाले, रुग्णांना योग्य आणि तातडीचे उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही शासनाच्या मदतीपासून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.

बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. ऑक्सिजन व रेमडेसिव्हीरचे नियोजन करण्यासोबतच रूग्णांना वेळवर उपचार मिळणे आवश्यक आहे. संकट काळात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य उपलब्ध होणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करावे.

''शासनाच्यावतीने देण्यात येणारी मदत आणि शिवभोजन थाळीची सेवा योग्य प्रकारे सुरु ठेवण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोणीही गरजू मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. रूग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. बारामती येथील महिला रूग्णालयात जनरेटर बसवून घेण्यात यावे. सर्व रूग्णालयामध्ये स्वच्छता ठेवावी असे,'' निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत अशा प्रकारची फसवणूक का केली जात आहे? - के. सी. वेणुगोपाल

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT