The administration Will take action against 15 private doctors who do not work in the Covid Center 
पुणे

कोवीड सेंटरमध्ये काम करण्यास १५ खाजगी डॉक्टरांवर दाखविला ठेंगा; प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता

डी .के. वळसे-पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन खाजगी डॉक्टरांनी मंचर उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी हजर होण्याचे आदेश 15 खासगी डॉक्टरांना २६ ऑगस्टला प्रांत अधिकारी सारंग कोडलकर दिले होते पण, शुक्रवारी (ता.४) पर्यंत एकही खाजगी डॉक्टर कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी हजर नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासन संबंधितांच्या विरोधात कायद्याचा बडगा उचलण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार ३०० पर्यंत गेली आहे. ४० जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे शासकीय डॉक्टरांची संख्या कमी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोरोना आजार रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी. या उद्देशाने राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद  तसेच अन्य प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.

खाजगी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन कोविड केअर सेंटर उभे करावे. या हॉस्पिटलला प्रशासनामार्फत सर्व प्रकारची मदत केली जाईल. असा प्रस्ताव देण्यात आला होता पण ,खाजगी हॉस्पिटल उभे करण्यास डॉक्टरांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे दुसरा प्रस्ताव देण्यात आला की खासगी डॉक्टरांनी मंचर उपजिल्हा रुग्णालय व अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये काम करावे. त्यांना शासकीय नियमानुसार मानधन दिले जाईल.असे सांगण्यात आले होते .त्यानुसार खासगी डॉक्टरांनी प्रस्ताव सादर केले होते.  कोडलकर यांच्या स्वाक्षरीने त्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले, पण अजूनही त्यापैकी एक डॉक्टर हजर झालेला नाही.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

''आंबेगाव तालुक्यात ८० खासगी डॉक्टर आहेत. सर्वांनाच आळीपाळीने कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत. फक्त १५ डॉक्टरांवरच का?'' असा प्रश्न नाव न छापण्याच्या अटीवर एका खासगी डॉक्टरने उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अमीर रशीद अलीची १० दिवसांची कोठडी एनआयएकडे

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुलाचं नाव अभिनय का ठेवलं? रेणुका शहाणे यांनी सांगितलं कारण, वाचून वाटेल अभिनेत्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT