पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी आता प्रशासकीय अधिकारी 'एक दिवस शाळेसाठी' देणार आहेत. एवढच नव्हे तर हे अधिकारी शाळेवर तासही घेणार आहेत. पण हे सगळ प्रत्यक्षात उतरायला काही काळ वाट पहावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या अडचणी सोडविण्याकरिता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे योगदान असावे, यासाठी 'एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्याचे शालेय शिक्षण विभागाच्या विचाराधीन होते. त्याप्रमाणे उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने आता घेतला आहे.
या उपक्रमामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या संख्येनुसार जिल्हाधिकारी ते तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा स्तरावर शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग एक आणि वर्ग दोनचे अधिकारी यांनी एका वर्षात तीन शाळांना भेटी देणे आवश्यक आहे. तसेच हा उपक्रम आनंददायी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस शाळेस भेट द्यावी. चालू अभ्यासक्रमाच्या काही भागाचे अध्ययन करावे, तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करावे, अशी सूचना शासन निर्णयाच्या अध्यादेशात केल्या आहेत.
मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाल्याशिवाय आणि शाळा पूर्ववत विद्यार्थ्यांनी भरल्याशिवाय हा उपक्रम प्रत्यक्षात येणे शक्य नाही. परिणामी, हा उपक्रम शाळांमध्ये राबविण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उपक्रमादरम्यान प्रशासकीय अधिकारी अशी करतील तपासणी :
- शाळेचा भौतिक दर्जा : मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, संरक्षण भिंत, क्रीडांगण
- विद्यार्थ्यांसाठी सुविधा : प्रथमोपचार पेटी, संगणक आणि इंटरनेट सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय
- शालेय पोषण आहार : आहार वाटपाचा नोंदणी, स्वयंपाकघराची स्वच्छता, दर्जा
- विद्यार्थ्यांची शालेय प्रगती : इयत्तेनुसार संख्याज्ञान आणि कौशल्य, आत्मविश्वास
- शाळा समितीच्या नियमित बैठका होतात का, पाहणे
- विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहणे
विद्यार्थी घडविण्यात लागणार हातभार
"शाळेमध्ये एखादा प्रशासकीय अधिकारी आला की, संपूर्ण शाळेचं रूपच पलटते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही संबंधित अधिकाऱ्यांला पाहणे, त्यांचे आत्मविश्वासाने दिलेले भाषण ऐकणे, त्यांच्याशी बोलणे याबाबत कमालीची उत्सुकता असते. शिवाय शालेय जीवनात भेटलेला अधिकारी कायम डोळ्यासमोर राहतात आणि आपणही त्यांच्याप्रमाणे बनावे, ही जिद्द निर्माण होते आणि त्यातून विद्यार्थी घडू लागतात. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी हातभार लावणारा आहे.", असे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी सांगतिले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.