पुणे

पुणे : 'त्या' गावांमध्येही अकरावीचे प्रवेश 'ऑनलाईन'च!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये शासन मान्यता प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे.

महापालिकेच्या क्षेत्रातील कळस, धानोरी, लोहगांव (उत्तर), लोहगांव (पूर्व), मुंढवा (केशवनगर पूर्व), हडपसर (साडेसतरानळी), फुरसुंगी, उरुळी देवाची दक्षिण पूर्व (हडपसर), महंम्मदवाडी, उंड्री, येवलेवाडी, कात्रज, धायरी, वडगांव बुद्रुक, आंबेगांव बुद्रुक, आंबेगांव खुर्द, शिवणे, बावधन खुर्द, वडगांव खुर्द, बाणेर, बालेवाडी या नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील सर्व मान्यता प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या https://pune.11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन होणार आहेत.

या गावातील कनिष्ठ महाविद्यालयाची नोंदणी https://pune.11thadmission.org.in या संकेतस्थळावर करावी. तसेच महाविद्यालयाचे लॉग-इन करण्यासाठी त्वरित 11thonlineadmissiondydpune@gmail.com या ई-मेल आयडीवर प्रस्ताव पाठवावा. यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदतवाढ असल्याने प्रथम प्राधान्याने कार्यवाही करावी. याबाबतचे निवेदन www.dydepune.com आणि pune.11thadmission.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही शेंडकर यांनी प्रसिद्ध निवेदनात म्हटले आहे.

अकरावीसाठी ऑफलाइन प्रवेश नकोत
"कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने अकरावीचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने करण्यात येऊ नयेत. अन्यथा त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेवर आणि प्राचार्यांवर राहील," असे अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT