घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील गोनवडी व वेल्हे (ता. वेल्हे) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ऑगस्ट 2020 च्या प्रवेश सत्राची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्ट 2020 पासून सुरू झालेली आहे. इच्छुकांनी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य अशोक साबळे यांनी दिली.
गोनवडी व वेल्हे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्य सरकारच्या आधिपत्याखालील कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अखत्यारित स्थापन झालेल्या शासकीय संस्था आहे. संस्थेतील सर्व व्यवसायांना डीजीटी नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त आहे.
गोनवडी संस्थेमध्ये सुरू असलेले एक वर्ष कालावधीचे व्यवसाय- कॉम्प्युटर ऑपरेटर कम प्रोग्रॅमिंग असिस्टंट, वेल्डर, फॅशन टेक्नॉलॉजी, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक. दोन वर्षीय कालावधीचे व्यवसाय- जोडारी, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रेफ्रिजरेशन ऍण्ड एअर कंडिशनिंग, इन्फॉर्मेशन ऍण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स, वायरमन. वेल्हे संस्थेमध्ये सुरू असलेले एक वर्ष कालावधीचे व्यवसाय- कॉम्प्युटर ऑपरेटर कम प्रोग्रॅमिंग असिस्टंट, प्लंबर, सुइंग टेक्नॉलॉजी. दोन वर्षीय कालावधीचे व्यवसाय- जोडारी, वायरमन.
जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अर्ज भरता येतील. प्रवेश अर्जातील सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवारांना प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. उमेदवारांना प्रमाणपत्र तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.
गोनवडी येथील प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी 66447677, 98604 23467, 99601 66294 या मोबाईल नंबरवर, तर वेल्हे येथील प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी 76204 18680, 95278 18181, 99601 66294 या मोबाईल नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.