election sakal media
पुणे

Pune | कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका दिवाळीनंतर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समित्यांची निवडणूक २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलली होती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवाळीची आतषबाजी संपल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धडाका सुरू होणार आहे. खेड, जुन्नर, मंचर, नीरा, भोर आणि मावळ या बाजार समित्यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सहकार विभागाकडून सुरू आहे.

खेड, जुन्नर, मंचर, नीरा आणि भोर या पाच बाजार समित्यांची मुदत ऑक्टोबर २०२० मध्ये संपलेली आहे. तर मावळ बाजार समितीवर १० ऑक्टोंबर २०१५ पासून प्रशासक आहे. या सहाही बाजार समित्यांच्या निवडणुका घेणार असल्याचे सहकार खात्याकडून सांगितले. तर इंदापूर, शिरूर, बारामती आणि दौंड या बाजार समित्यांची मुदत अद्याप संपुष्टात आलेली नाही. मुळशी बाजार समितीवर सध्या अशासकीय प्रशासक मंडळ आहे. पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २७ जुलै २००३ रोजी संपुष्टात आली आहे. या समितीवरही प्रशासक, प्रशासकीय मंडळ आहे. या बाबत न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्यावरील आदेशानंतर निवडणूक होईल असे सांगण्यात येत आहे.

मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समित्यांची निवडणूक २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलली होती. त्यावरील स्थगिती उठल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम जाहीर केला आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबोले म्हणाले, ‘‘राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार खेड, जुन्नर, मंचर, नीरा, भोर आणि मावळ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधकांकडून विकास सोसायट्या आणि गट विकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत सदस्यांच्या याद्या मागविल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Shocking News : आईने डोळ्यादेखत पाहिला मुलाचा मृत्यू ! नॅशनल बॉडी बिल्डरचा धक्कादायक अंत, घराबाहेर पडताना खाली कोसळला अन्...

Infertility Causes: आई-बाबा होण्यात येतोय अडथळा? 'ही' ३ कारणं ठरू शकतात जबाबदार; तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले; पाणीटंचाईवर चर्चा अर्धवट, बोपोडी दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद !

Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

SCROLL FOR NEXT