बारामती : आगामी पाच राज्यांतील निवडणूकीत आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल असा ट्रेंड दिसतो आहे. हा भाजपचा पराभव देशाला नवीन दिशा देणारा ठरेल, अशी मला खात्री वाटते, अशा शब्दात पाच राज्यातील निवडणूकीनंतर देशातील राजकीय गणिते बदलतील असा अंदाज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बोलून दाखविला.
बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. पाच राज्यातील निवडणूकीबाबत बोलताना पवार म्हणाले, ''पश्चिम बंगालमध्ये भाजप व केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका घेतली आहे, बंगाली संस्कृती व तेथील लोकांचे मन या वर आघात करण्याचा प्रयत्न कुणी केला, तर राज्य एकसंघ होतं व तशी प्रतिक्रीया व्यक्त करतं, त्यामुळे कुणी काही म्हणत असल तर पश्चिम बंगालमध्ये ममतांच सरकार सत्तेवर येईल याची मला पूर्ण खात्री आहे, असे पवार म्हणाले.
केरळमध्ये डाव्यांच्या सोबत राष्ट्रवादी असून, त्यांना निर्विवाद बहुमत मिळेल. तामिळनाडूमध्ये आज लोकांच कल डीएमके म्हणजेच स्टॅलिन यांच्या बाजूने आहे. स्टॅलिन हे तमिळनाडूची सूत्रे हाती घेतील व लोक पाठिंबा देतील. आसाममध्ये भाजपची स्थिती तुलनात्मक चांगली आहे, तेथे त्यांचा विजय होईल असे वाटते.
शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारने समंजसपणाची भूमिका न घेतल्याने लोकसभा व राज्यसभाही चालू शकली नाही. या बाबत उद्याच्या अधिवेशनात काय होते ते पाहू या, पण या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशीच संसदही अस्वस्थ आहे. त्यामुळे उद्या या बाबत काही प्रतिक्रीया उमटू शकते असे कुणी म्हटले तर ते चुकीचे नाही.''
भाजपचे खासदार साक्षी महाराजांनी शेतक-यांना खलिस्तानवादी संबोधल्याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, ''बेजबाबदारपणे बोलण्यासंदर्भात काही लोकांचे वैशिष्टय असते, आज जे लोक शेतक-यांना दहशतवादी, खलिस्तानवादी संबोधत असतील तर अशा लोकांना का महत्व द्यायचे, असा प्रतिप्रश्न करत अशा लोकांना आपण महत्व न देणं हेच त्यांना उत्तर आहे.
सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यासंदर्भात विचारले असता, हा लहान प्रश्न आहे, ही बाब म्हणजे काही राज्याचे धोरण नव्हे, असे म्हणत त्यांनी यावर भाष्य केले नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत विचारले असता, कधी नव्हे इतके महाराष्ट्र आज आर्थिकदृष्टया अडचणीत आहे, पण यातूनही राज्य सरकार निश्चितपणे काहीतरी मार्ग काढेल अशी मला खात्री वाटते, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्र घेतेय बघ्याची भूमिका- बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतला नाही, या बाबत विचारता पवार म्हणाले, ''मंत्रीमंडळाने जे निर्णय घेतले आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम राज्यपालांचे असते, घटनेने मंत्रीमंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. लोकशाही व घटना न पाळणारे राज्यपाल महाराष्ट्राने या पूर्वी कधीही पाहिले नाहीत. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केलेला आहे. ही दुर्देवाची गोष्ट आहे. या बाबत केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. वास्तविक नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना राज्यपालांकडून अडवणूकीचा अनुभव आलेला असतानाही आज महाराष्ट्राबाबत काही निर्णय होत नाही. बघ्याची भूमिका केंद्र घेतेय या बाबत पवार यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.