after Petrol Diesel Vehicle insurance Third Party Insurance Expensive from June 1 pune
after Petrol Diesel Vehicle insurance Third Party Insurance Expensive from June 1 pune sakal
पुणे

वाहनांच्या विम्याचा ‘टॉप गियर’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आधीच पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहनधारक चिंतेत आहेत, त्यात आता विम्याची भर पडणार आहे. १ जूनपासून दुचाकी व चारचाकीचा थर्ड पार्टी विमा महागणार आहे. विम्याच्या प्रीमियम दरात वाढ केली आहे. गाडीच्या इंजिनानुसार विम्याची रक्कम जास्त असणार आहे.वाहनांना विमा अनिवार्य आहे. मात्र, अनेकजण केवळ चारचाकीवरच विमा काढतात. दुचाकीवर विमा काढण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आता त्याचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. फूल विम्याच्या तुलनेत थर्ड पार्टी विमाचे प्रीमियम खूप कमी किमतीत असतात. मात्र, त्याकडे देखील वाहनधारक आता दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे.

ई-कारला तीन वर्षांसाठी...

ई-कारसाठी तीन वर्षांचा प्रीमियम ठरवून दिला आहे. ३० किलोवॉट क्षमतेच्या ई-कारसाठी प्रीमियम ५,५४३ रुपये आहे. ३० किलोवॉट ते ६५ किलोवॉटमधील ई-कारसाठी ९,०४४ रुपये आकारला जाईल. ६५ किलोवॉटपेक्षा जास्त क्षमतेच्या ई-कारांसाठी आता २०,९०७ रुपये इतका प्रीमियम असेल.

ई-दुचाकीला पाच वर्षांसाठी...

तीन किलोवॉट क्षमतेच्या ई-दुचाकीसाठी पाच वर्षांचा सिंगल प्रीमियम २,४६६ रुपये ठरवून दिला आहे, तर तीन ते सात किलोवॉट क्षमतेच्या वाहनासाठी ३,२७३ रुपये असेल. त्याचप्रमाणे सात किलोवॉट ते १६ किलोवॉट क्षमतेच्या दुचाकींना पाच वर्षांसाठी ६,२६० रुपये प्रीमियम, तर १६ किलोवॉटपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांना १२,८४९ रुपये प्रीमियम भरावा लागेल.

नवीन दर असे...

२,०९४ रु.

१००० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी

३,४१६ रु.

१००० ते १५०० सीसीच्या वाहनांसाठी

७,८९७ रु.

१५०० सीसीपेक्षा जास्त असलेल्या वाहनांसाठी

दुचाकीवरील प्रीमियमचे नवीन दर

  • १५० ते ३५० सीसीपर्यंत दुचाकींसाठी १,३६६ रु.

  • ३५० सीसीवरील इंजिनसाठी २,८०४ रु.

  • १००० सीसीसाठी किमान तीन वर्षांचा एकरकमी ६,५२१ रु.

  • १००० ते १५०० सीसीसाठी तीन वर्षांचा १०,६४० रु.

  • १५०० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्यांना तीन वर्षांसाठी २४,५९६ रु.

  • ७५ आणि १५० सीसीमधील बाइकसाठी पाच वर्षांचा एकरकमी ३,८५१ रु

  • १५० सीसीपेक्षा जास्त आणि ३५० सीसीपेक्षा कमी दुचाकींसाठी ६,३६५ रु.

  • ३५० सीसीपेक्षा जास्त दुचाकींसाठी १५,११७ रु.

आधीच इंधनाच्या वाढत्या दरामुळे महागाई वाढली आहे. वाहनाच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. आता थर्ड पार्टी विमाही वाढणार आहे. मुळात हा विमा काढणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्याचे प्रीमियम वाढल्याने विमा काढणे महागात पडणार आहे. त्यामुळे वाहनधारक विमा काढायचा की नाही, याचा नक्कीच विचार करतील.

- पूजा डोईफोडे, वाहनधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT