PVC-Pipe
PVC-Pipe 
पुणे

शेती अवजारे, पीव्हीसी पाइप महागले

प्रवीण डोके

वर्षभरात तब्बल ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ; शेतकरी दुहेरी संकटात
मार्केट यार्ड - बाजारात विविध प्रकारच्या शेती अवजारे आणि पीव्हीसी पाइपच्या दरात मागील वर्षभरात ७० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.

कोरोना विष्णूच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील काही खासगी कंपन्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. तसेच देशातील कच्च्या मालाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक छोटे उद्योग बंद पडले आहेत. शेतीसाठी लागणारे पीव्हीसी पाइप, कटर, घमेले, बादल्या, पाण्याची टाकी, ठिबक सिंचन यासह बांधकाम व्यावसायासाठी लागणारे ड्रेनेज व प्लंबिंगचे पाइप या सर्वच वस्तूंच्या भावात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पीव्हीसी पाइप, तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा मोठा वापर करतात. परंतु वाढणाऱ्या दरामुळे शेतमाल उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. भारतात पाइप बनणाऱ्या पावडरचा मोठा पुरवठा रिलायन्स ग्रुपकडून या उद्योगाला होतो. या कंपनीकडून देशातून मोठी निर्यात सुरू आहे. भारतात याचा अभूतपूर्व असा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अजून किमान तीन ते चार महिने तरी यामध्ये दर घटण्याची चिन्हे नाहीत, असे पीव्हीसी पाइपचे व्यापारी दर्शन लोढा यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची बहुतांशी शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. याबाबत लागणाऱ्या सर्व वस्तूंत सातत्याने दरवाढ होत आहे. तर दुसरीकडे बाजारात शेतीमालाला म्हणावा तेवढा दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने दर कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
- संतोष राजेशिर्के, शेतकरी, वेल्हे

पीव्हीसी पाइपचे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. कंपनी मागणीच्या तुलनेत माल कमी पाठवत आहे. उत्पादनाच्या तुलनेत पाइप व इतर अवजारांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.
- दर्शन लोढा, व्यापारी, पीव्हीसी पाइप

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT