Farmer
Farmer 
पुणे

मागासवर्गीय, आदिवासी शेतकऱ्यांना 'या'साठी मिळणार अडीच लाखाचे अनुदान!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने मागासवर्गीय आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी ३०५ विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. या विहीरींची खोदाई आणि बांधकामासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी ही माहिती दिली. एकूण मंजूर विहिरींपैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १०३ तर, आदिवासी शेतकऱ्यांसाठी २०२ विहीरी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, या मंजूर विहिरींपैकी २६५ विहीरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. यापैकी ९३ विहीरी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत १४९ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. 

पुणे जिल्ह्यातील अनुसुचित जाती (नवबौद्धासह), जमातीमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी. त्यांचे जीवनमान उंचावावे आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावेत, या उद्देशाने या शेतकऱ्यांना विहीर खोदाईसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. 

यानुसार अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत पुणे विहीरींसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येते. 

या योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्त करणे, विहिरीतील बोअरवेल, वीजजोडणी आकार, पाणीपंप संच, शेततळ्याचे प्लास्टिक सूक्ष्म सिंचन संच या बाबींसाठी मिळून प्रत्येकी  ३ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. 

दरम्यान, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते पूर्ण झालेल्या ९३ विहिरींचे जलपूजन करण्यात आले. मावळ तालुक्यातील सावळा येथील शेतकरी सदाशिव चंद्रकांत डोंगे यांच्या विहीरीवर हे जलपूजन करण्यात आले.

पावणेआठ कोटींचा निधी - पानसरे

जिल्ह्यातील आदिवासी आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहीर खोदाई करण्यासाठी ७ कोटी ६२ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी  आतापर्यंत ४ कोटी ३२ लाख  रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया :- 

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत विहीर खोदाईसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. यामुळे माझी शेती सिंचनाखाली आली. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी ही फारच उपयुक्त योजना आहे.
- खंडू ढमढेरे, देऊळगाव राजे, ता. दौंड.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून मला विहीर मंजूर झाली होती. यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळाले आणि विहीरीचे कामही पुर्ण झाले आहे. ही मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना आहे.
- संतोष वेताळ, न्हावरे, ता. शिरुर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT