air-pollution sakal
पुणे

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या महिन्याभरात समाधानकारक श्रेणीच्या खाली नोंदली गेली

सफर या संकेतस्थळावर पुण्यासह, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद दररोज घेतली जाते.

अक्षता पवार

सफर या संकेतस्थळावर पुण्यासह, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद दररोज घेतली जाते.

पुणे - शहरातील हवेची गुणवत्ता (Air Quality) गेल्या महिन्याभरात २३ दिवस समाधानकारक श्रेणीच्या खाली नोंदली गेली. पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळामुळे (Dust Storm) हा परिणाम झाला असून यामुळे अतिसूक्ष्म धुलीकणांच्या (पीएम २.५) प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले, अशी माहिती भारतीय उष्णकटीबंधिय हवामानशास्त्र विभागाच्या (आयआयटीएम) (IIITM) ‘सफर’ या संकेतस्थळावरून स्पष्ट झाली आहे.

सफर या संकेतस्थळावर पुण्यासह, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद दररोज घेतली जाते. जानेवारी दरम्यान इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील हवेची गुणवत्ता वाईट किंवा अति वाईट या श्रेणीत एकाद दुसऱ्या दिवशीच असल्याचे पाहायला मिळते. मात्र या वर्षी वाईट व अति वाईट श्रेणींतील नोंदी वाढल्याचे दिसून आले. तसेच पीएम २.५ चे प्रमाण सुद्धा वाढले होते, अशी माहिती आयआयटीएमच्या शास्त्रज्ञांनी दिली.

याबाबत ‘सफर’चे संस्थापक संचालक डॉ. गुफरान बेग यांनी सांगितले की, ‘‘धुळीचे वादळ हे प्रामुख्याने उन्हाळ्याच्या हंगामात जास्त उद्भवतात. आखाती देशातून येणाऱ्या धुळीचे वादळ सामान्यतः पुण्यापर्यंत येत नाहीत. मात्र, यावर्षी २३ जानेवारी आणि गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता. ३) असे दोन धुळीचे वादळ आले होते. धुळीच्या वादळांमध्ये सातत्यता आणि पश्‍चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे या वादळाचा प्रभाव अहमदाबाद, मुंबईसह पुण्यावर ही दिसून आला. त्यात थंडीत झालेली वाढ, तापमान, मंद वारे, आर्द्रता अशा स्थानिक परिस्थितीमुळे धुळीच्या वादळांबरोबर आलेले धुलीकण हे हवेत तरंगत राहतात. अशीच स्थिती पुण्यात ही होती, तसेच जानेवारीत पाऊस देखील झाला नव्हता. त्यामुळे हे धुलीकण हवेतच जास्त काळ तरंगत होते. त्यामुळे २३ जानेवारीनंतर शहरातील हवेची गुणवत्ता घसरली होती. ही स्थिती ५ फेब्रुवारीपर्यंत पाहायला मिळाली. परंतु शहरातील हवेची गुणवत्ता आता पुन्हा समाधानकारकवर पोचली आहे.’’

वर्षभरातील पीएम २.५ चे प्रमाण पाहता दिल्लीमध्ये सरासरी हे प्रमाण जवळपास १०० प्रति घनमीटर इतके आहे. तर पुण्यात पीएम २.५ चे वार्षिक प्रमाण सरासरी ३५ ते ४५ प्रति घनमीटर इतके नोंदले जाते. तसेच मुंबई, कोलकत्ता, कानपूर, लखनौ, बंगळूर, अहमदाबाद सारख्या शहरांच्या तुलनेत पुण्यातील हवेची गुणवत्ता चांगली असते. साधारणपणे पुण्यात हवेची गुणवत्ता चांगली आणि समाधानकारक या श्रेणीत सर्वाधिक नोंदले जाते.

- डॉ. गुफरान बेग, शास्त्रज्ञ आयआयटीएम

शहरातील स्थिती (स्रोत आयआयटीएम)

- पुण्यातील हवेची गुणवत्ता हळू-हळू खराब होण्याच्या दिशेने

- गेल्या आठ वर्षांत वाहनांच्या उत्सर्जनात सातत्याने वाढ

- वाहन प्रदूषणामुळे पीएम २.५ च्या प्रमाणात सुमारे ७० टक्के वाढ झाली आहे

शहरातील हवेची गुणवत्ता (जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत)

हवेची गुणवत्ता - दिवसांची संख्या

चांगली - १

समाधानकारक - १३

मध्यम - १८

वाईट - १

अति वाईट - ४

हवेची गुणवत्ता (प्रमाण प्रति घनमिटरमध्ये)

चांगली - ०-५०

समाधानकारक - ५०-१००

मध्यम - १००-२००

वाईट - २००-३००

अति वाईट - ३००-४००

चिंताजनक - ४००-५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT