Ajit Pawar 
पुणे

'अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री'; गोविंद बागेतील पोस्टरची चर्चा

बारामतीत अजित पवारांच्या एका समर्थकांनं हे पोस्टर झळकवलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

बारामतीमधील गोविंद बागेत पाडव्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र येत असतात. यावेळी अजित पवारांच्या एका समर्थकांनं त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छांचं पोस्टर झळकवलं. यामध्ये अजित पवारांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आल्यानं या पोस्टरची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. (Ajit Pawar Future Chief Minister of Maharashtra poster in front of Govind Bagh Baramati)

गोविंद बागेत पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून त्यांचे शुभचिंतक भेट देतात. यावेळी शरद पवारही त्यांच्या शुभेच्छा स्विकारतात. त्यानुसार एक कार्यकर्ता अजित पवारांना भेटण्यासाठी आला होता. त्यानं आपल्यासोबत एक बोर्ड आणला यावर अजितदादा, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. हा फलक त्यानं गोविंद बागेबाहेर लावल्यानं त्याची सर्वत्र चर्चा सुरु होती.

शरद पवार, अजित पवार, सुप्रीया सुळे यांच्यासह पवार कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट होत असल्यानं राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येत दरवर्षी गोविंद बागेला पाडव्याच्या दिवशी भेट देतात. यंदाही पवार कुटुंबियांचा हा सोहळा दरसालाप्रमाणं संस्मरणीय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT