Ajit-Pawar-.jpg 
पुणे

धरणे भरुनही पुणेकरांना पाणी नाही, आंदोलन करावे लागते : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे : पुण्यातील धरणे भरली आहे, तरीही पुणेकरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाण्यासाठी लोक आंदोलन करीत आहेत. पाऊस नसतानाही मी पालकमंत्री म्हणून पुणेकरांना पाणी कमी पडू दिले नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली. पुण्यात पवार यांना कार्यकर्ता मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी भाजप सरकारच्या कामकाजावर टिका केली.

आधीच्या ५४ वर्षात जेवढे कर्ज होते, तेवढे भाजपने 5 वर्षात कर्ज केले
''भाजप सरकारने राज्याला कर्जबाजारी केले आहे. या पाच वर्षात अडीच लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे. याआधीच्या ५४ वर्षात एवढे कर्ज होते, तेवढे भाजपने पाच वर्षात कर्ज केले'', अशी टिका त्यांनी यावेळी केली

अजित पवार म्हणाले, पुण्यातील 'या' चार जागा आमच्याकडेच  
आघाडीत समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काही जागा अन्य पक्षाला सोडणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील दोन दिवस चर्चा होईल. असे सांगून त्यांनी, पुढील महिनाभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्तांनी जोमाने काम करावे असे आवाहन केले. पुण्यातील पर्वती, हडपसर, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याची घोषणा आज पवारांनी केली. कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट काँग्रेसला, तर कोथरुड मित्र पक्षाला सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 ''काही जागा मित्र पक्षांकडे असतील पण त्या राष्ट्रवादीच्या आहेत समजूनच झटा. मतभेद बाजुला ठेवा, भांडयाला लागते पण त्याचा आवाज किती ? आता शहाणयासारखे वागा. अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना समज दिली.

कोथरूड मतदारसंघ अखेर मनसेला ! 
 कोथरूड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यायचे ठरले आहे. काँग्रेसला तसे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडे पण उमेदवार नसल्यामुळे असे ठरले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT