Gram Panchayat Election Results Esakal
पुणे

Gram Panchayat Election Results: बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, 'स्वतःची पाठ थोपटून...पैसे...'

आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १३ जागांवर अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यभरात काल(रविवारी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पुणे जिल्हयातील २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.तर आज आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १३ जागांवर अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे.

तर याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, 'आता सुरुवात झालीय, पुढे पाहावं लागेल कशा पद्धतीने निकाल लागतील. स्वतःची पाठ थोपटून घेतात हे योग्य नाही. पैशाचा वापर ग्रामपंचायतीमध्ये केला गेला, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

तर आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बारामतीमध्ये आमबी बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी, गाडी खेल, जराडवाडी, करंजे, कुतवल वाडी,सिद्धेश्वर निंबोडी, दंडवाडी, मगर वाडी, साबळे वाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला आहे.

अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपचा आरोप

भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. ही निवडणूक गावकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे. गावातील भ्रष्टाचार आणि दहशत आपल्याला कमी करायची आहे. गावात काहीच व्यवस्था नाहीत. नाव मोठं आणि लक्षण खोटं, अशी परिस्थीती गावात आहे, असे कचरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT