पुणे

अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

सकाळवृत्तसेवा

पुणे: 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 'कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी तसेच 'कोरोना'बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम सुरु केली आहे. 'कोरोना'ला हरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा आणि नागरिक यांचा या मोहिमेतील सहभाग महत्त्वाचा असून, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतील.''

'कोरोना'च्या संकटकाळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावे, कोरोना उपाययोजनांची प्रत्येक माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जबाबदारीपूर्वक करावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.

महापौर मोहोळ म्हणाले, ''कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे आहे. जम्बो रुग्णालयातही बेड वाढविण्याची गरज आहे.'' विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'  अभियानाचा तपशील व पुढील नियोजन, सामाजिक कृतिशील समूह समिती, ऑक्सिजन पुरवठा नियोजन, बेड उपलब्धता, पुणे जिल्हयाची अनुमानित रुग्णसंख्येचा तपशील, अनुमानित बेड संख्येचा तपशील, आवश्यक असणा-या बेडसाठी प्रस्तावित उपाययोजना, व्हेंटीलेटर उपलब्धता आदी उपाययोजनांची माहिती दिली.

जमाबंदी आयुक्त तथा ससूनचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT