Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
पुणे

सुपे वगैरेंना सोडणार नाही; शेवटपर्यंत तपास करणार - अजित पवार

सम्राट कदम

कुठल्याही सरकारच्या काळात हे घडले असले तरी कारवाई होणार असंही अजित पवार यांनी सांगितलं

पुणे : पेपर भरती घोटाळा (Paper Leak Scam) प्रकरणामध्ये तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांच्याकडे सापडलेल्या संपत्तीबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली तर ते भलतंच काही करतात. तुकाराम सुपे सारखे अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपये सापडतात. आमच्या मुलामुलींच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कुणालाच नाही. शेवटर्यंत तपास करणार, कुणालाच सोडू नये, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पुण्यात महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या प्रशिक्षण संस्थेच्या उदघाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

पवार म्हणाले,"अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती सापडणे धोकादायक आहे. कुणाच्याही काळातील भ्रष्टाचार असेल तरी चौकशी होणार. आवश्यकता वाटेल तेव्हा तपास केंद्रीय चौकशी यंत्रणा सीबीआय कडे देऊ. तुकाराम सुपे प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून त्याचे धागेदोरे कुठे गेलेत त्याचा तपास पोलीस योग्य करत आहेत. अशा घटना घडता कामा नये. यावर योग्य कारवाई केली जाईल असंही अजित पवार यांनी सांगितलं.

सीबीआयकडे तपास देण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सीबीआयला बाकीचं काम आहे. एखादी तपास यंत्रणा योग्य काम करत आहे. तुम्ही पण पाहताय, सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआयने काय केलं.आम्हाला वाटलं की आणखी कोणाला जबाबदारी दिली जावी तेव्हा सरकार विचार करेल. कुठल्याही सरकारच्या काळात घडले असले तरी कारवाई होणार असंही अजित पवार यांनी सांगितलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या नियमावलीबद्दल अजित पवार म्हणाले की, रात्री 12 वाजता निर्णय झाला. आता आज कार्यक्रमात तेवढे नियम पाळले पाहिजेत. दिल्ली मुबंईत आंतराष्ट्रीय विमान जास्त येत आहेत. अनेकजण बाहेरून येतायत. काही बाबतीत मुरड घातली पाहिजे. नवीन वर्ष त्यानिमित्त पार्ट्या असतात असतात, तर नियमावलीचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT