PMC 
पुणे

पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल!

ज्ञानेश सावंत

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभाऱ्यांवर जोरदार निशाणा साधताना गेल्या तीन वर्षातील प्रकल्पांच्या फुगलेल्या निविदा प्रकरणांची गांभीर्याने चौकशी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता.14) पुण्यात स्पष्ट केले.

फुगलेल्या निविदा रद्द झाल्याने पुणेकरांचे साडेचार हजार कोटी रुपये वाचल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले. आपल्या भाषणाच्या सुरवातीला 'सकाळ'मधील वृत्त वाचून दाखवत पवार यांनी ही प्रकरणे गंभीर असल्याचेही स्पष्ट केले. 

नियोजित विशेषत: समान पाणीपुरवठा योजना, 'एचसीएमटीआर' 'जायका', कात्रज-कोंढवा रस्ता आणि जलपर्णीच्या फुगविलेल्या निविदा रद्द झाल्या. त्यामुळे पुणेकरांचे सुमारे साडेचार हजार कोटी रुपये वाचल्याचे 'सकाळ' ने उघड केले आहे.

त्यामुळे या प्रकल्पांच्या सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या निविदांची चौकशी करण्याच्या हालचाली नवे सरकार करीत असल्याचे वृत्त 'सकाळ'ने शनिवारी (ता.14) प्रसिद्ध केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण करताना पहिल्यांदा 'सकाळ'मधील वृत्त वाचून दाखविले. त्यानंतर या प्रकरणांची गांभीर्याने चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मालवाहू जहाजांना फटका! 'जेएनपीए'त अडकले एक लाखाहून अधिक कंटेनर

Buldhana News: जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी; पाणीटंचाई निवारणः १२७ उपाययोजनांना मिळाली प्रशासकीय मान्यता

Latest Marathi News Live Update : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

Mumbai News: धारावीकरांसाठी दिलासादायक बातमी! कागदपत्र पडताळणी आता जागेवरच; प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

राज्यात ७५०० पैकी २००० पंप बंद, तरी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात,'पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका'

SCROLL FOR NEXT