पुणे

तिसऱ्या लाटेचा विचार करुन नियोजन करा : अजित पवारांच्या सूचना

मिलिंद संगई, बारामती

बारामती : ''कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत(Third wave of Corona) लहान मुलांना(children) धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करावे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना कराव्यात'' अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) यांनी दिल्या.

शनिवारी (ता. 15) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास आवश्यक उपचार वेळेत देण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य काळजी घ्यावी. लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करावी.

शासकीय व खाजगी रुग्णालयांनी लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवाव्यात. 'म्युकरमायकोसिस' रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. औषधांचा व लहान मुलांवरील उपचाराच्या औषधांसह साधनांची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी, कोरोना बाधित लहान मुलांच्या पालकांची निवासाची सोय गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपअभियंता विश्वास ओव्हाळ, राजेंद्र धोडपकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, गटनेते सचिन सातव, संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT