म्युकरमायकोसिस ई सकाळ
पुणे

म्युकरमायकोसिसचे रुग्ण शोधा, उपचाराचे नियोजन करा ; अजित पवार

‘म्युकरमायकोसिस’बाबत अजित पवार यांची महापालिकेला सूचना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेपाठोपाठ राज्य सरकारनेही खबरदारीच्या उपायांना प्राधान्य दिले आहे. कोरोनामुक्त झालेल्या मात्र; उपचारांत ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा वापर केलेल्यांना ‘ट्रेस’ करून, ‘म्युकरमायकोसिस’च्या संशयितांवर थेट उपचाराचे नियोजन करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला शुक्रवारी केली. तेव्हाच, अशा व्यक्तींची कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये तपासणी करून गरजेनुसार उपचाराची व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक होणार आहे.Ajit Pawar's instruct PMC to Find patients of mucormycosis and plan treatment for them

दरम्यान, साधारपणे ३० हजार रुग्णांशी संपर्क करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून रुग्णांची विचारपूस करावी. ज्यांना डोळे, कान, नाक, आणि चेहऱ्याच्या इतर भागाला काही त्रास असलेल्यांची माहिती घेण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

अशी आहे स्थिती
- महापालिकेच्या हद्दीत सध्या ‘म्युकरमायकोसिस’चे दोनशे रुग्ण आढळले आहेत
- या रुग्णांच्या विविध प्रकारच्या १६ तपासण्या करून त्यांच्या उपचार करण्यात येत आहेत
- त्यासाठी महापालिकेच्या तीन रुग्णालयांत निदान आणि उपचाराची सोय
- हा आजार झालेल्यांपैकी ७० टक्के रुग्ण बरे झाले आहेत
- पुढच्या काळात याच आजाराच्या उपचार सुविधा वाढविण्यावर भर

''महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये रोज ‘म्युकरमायकोसिस’च्या किमान ५० ते ७० संशयितांची तपासणी करण्याचे नियोजन असून, त्यासाठी १० तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक राहणार आहे. ‘म्युकरमायकोसिस’च्या संशयितांशी संपर्क केला जाईल. मात्र, ज्यांना लक्षणे जाणवत आहेत, त्यांची तपासणी करून घेता येईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचाराची दिशा ठरविण्यात येईल.''
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

''कोरोनाची तिसरी लाट, तिची तीव्रता आणि ‘म्युकरमायकोसिस’चे प्रमाण वाढत असल्याने त्याच्या निदान, उपचारासाठी महापालिका यंत्रणा उभारत आहे. निदान उपचाराची सोय असली तरी पुढच्या काळात तज्ज्ञ म्हणजे, कान, नाक, डोळे, घसा तज्ज्ञांची कमतरता भासू नये, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याच्या हालचाली महापालिकेने केले आहे. कमला नेहरू रुग्णालयातील नियोजित केंद्रासाठी पुरेसे तज्ज्ञ असतील.''
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT