Akshay Baban from Pargaon has been lauded for honestly returning the found mobile
Akshay Baban from Pargaon has been lauded for honestly returning the found mobile 
पुणे

कौतुकास्पद ! रस्त्यावर सापडलेला 20 हजाराचा मोबाईल प्रामाणिकपणे मूळ मालकास केला परत

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भिमाशंकर साखर कारखान्याच्या कर्मचारी अक्षय बबन भोर घरी जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात सापडलेला 20 हजार रुपये किंमतीचा मोबाइल त्यांनी प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

अक्षय भोर हे शुक्रवारी संध्याकाळी कारखान्यातून सुट्टी झाल्यानंतर वळती येथे घरी जाताना त्यांना शिंगवे गावाच्या जवळ रस्त्यामध्ये मोबाईल सापडला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्या मोबाईलवर नगदवाडी (ता. जुन्नर) येथील सुधीर दादाभाऊ बढे यांचा फोन आला की काल संध्याकाळी पत्नी व मी मोटारसाईकलवरुन कवठे वरुन नगदवाडी येथे येत असताना माझ्या पत्नीचा मोबाईल पारगाव व शिंगवे दरम्यानच्या रस्त्यात पडला आहे. त्यावेळी भोर यांनी त्यांना सांगितले आहे. तुमचा मोबाईल मला सापडला आहे. काही काळजी करु नका. उद्या सकाळी भिमाशंकर साखर कारखाना येथे येऊन तुमचा मोबाईल घेऊन जा असे सांगितले. 

शनिवारी सकाळी सुधीर बढे व त्यांची पत्नी अश्विनी हे दोघे कारखान्यामध्ये आल्यानंतर अक्षय भोर यांनी त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे सुपुर्द केला. त्यावेळी अक्षय भोर यांना मोबाईल मालकाने देऊ केलेली रोख रकमेचे बक्षिस नाकारले आहे. यावेळी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, आदेश थोरात, राहुल भोर, अजीत चिखले, प्रविण शेटे, नरेंद्र गायकवाड उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT