Coronavirus death  sakal
पुणे

पुण्यात पुन्हा धोक्याची घंटा; कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू तर...

पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूत वाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या कमी असली तरी, मागील पाच दिवसांपासून सातत्याने एका दिवसातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. बुधवारी (ता.१९) दिवसात जिल्ह्यात १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील नऊ मृत्यू आहेत. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १२ हजार ६३३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुणेकरांनी कोरोनाबाबत घाबरू नये. परंतु अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Pune corona update)

जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६ हजार ४४१ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ३ हजार ५०५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ९१८, नगरपालिका हद्दीत ४६० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३०९ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील नऊ मृत्यूबरोबरच जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एक मृत्यू आहे.

दिवसभरात ८ हजार ३५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ८५७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ६४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक हजार ९, नगरपालिका हद्दीतील २५३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १७४ जण आहेत. दरम्यान जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा पाऊण लाखाच्या घरात पोचला आहे.

पुणे जिल्ह्यात १५ जानेवारीला पाच, १६ तारखेला आठ, १७ जानेवारीला दहा, १८ तारखेला आठ आणि १९ जानेवारीला १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानपरिषद निकालानंतर भाजपचे आरोप, शिवसेनेनं प्रत्युत्तर देत नागपूरवरून डिवचलं; म्हणाले, आत्मपरीक्षणाची गरज

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT