Alive baby girl dumped in the trash at Yerawada in Pune 
पुणे

Video : आई तू पण; तरीही मी जगणारचं....

दिलीप कुऱ्हाडे

येरवडा(पुणे) : आई तू पण; तुला पण मी नकोशी आहे का? तुला मी नको असले तरीही मी जगणारचं...असा निर्धार जणू त्या चिमुकलीने केला असावा. म्हणूनच कचऱ्यात टाकून दिल्यानंतरही ती जगण्यासाठी धडपडत होती. अन् अखेर तिची जगण्याची धडपड यशस्वी झाली.

विश्रांतवाडी येथील एकतानगरमधील कचरा कुंडीत सकाळी कचरा वेचक महिलेला जिवंत मुलीचे अभ्रक सापडले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हे अर्भक विश्रांतवाडी पोलिसांच्या मदतीने ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर ‘नकोशी’ला दत्तक घेण्यासाठी अनेकजण पुढे आले. यामध्ये डॉक्टर दाम्पत्यचा समावेश आहे. 

Video : पहाटेचा 'लिंबूडाव' झाला कॅमेऱ्यात कैद, काय ते पाहा...
 
काय घडले?
एकतानगर वस्तीशेजारील कचरा कुंडीत अज्ञात व्यक्तींनी बुधवारी पहाटे मुलीचे अभ्रक टाकल्याची घटना उघडकीस आली. कचरा वेचक लक्ष्मी राजू डेबरे (वय ३८,रा. चंद्रमानगर, मेंटल कॉर्नर, येरवडा) हे कचरा वेचताना त्यांना कपड्यात गुंडाळलेले अभ्रक दिसले. त्यांनी तत्काळ पर्यवेक्षक भागवत राऊत यांना कळविले. त्यानंतर राऊत यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस घटनास्थळी हजर झाले. महिला पोलिस कर्मचारी ऋतिका जमदाडे यांनी जीवंत अभ्रकाला तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)

'नकोशी' इतरांना झाली हवीशी
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड म्हणाले, ‘‘जीवंत मुलीचे अभ्रक सापडल्याची घटना ऐकून अनेकांनी अभ्रक दत्तक घेण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये डॉक्टर दाम्पत्याचा समावेश आहे.  ‘नकोशी’ प्रत्येकाला दत्तक म्हणून हवी आहे. हे चित्र समाधानकारक आहे. डॉक्टर दांपत्याकडे ही मुलगी दत्तक म्हणून गेल्यास मुलीचे भाग्य उजळेल, ती सुद्धा डॉक्टर होईल यात शंकाच नाही.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT