Market 
पुणे

Farmers Protest: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व उपबजार बंद राहणार!

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव (पुणे) : नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या वतीने मंगळवारी (ता.८) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाठिंबा आहे. यामुळे मंगळवारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व उपबजार बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

सभापती काळे म्हणाले, केंद्र सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये केलेल्या तीन कृषी कायद्यामूळे शेतकरी हीत धोक्यात आले आहे. या कायद्यानुसार कंपनी ते शेतकरी शेतमालाच्या खरेदी विक्रीचे करार होणार आहेत. यामध्ये शेतमालाचे पैसे मिळण्याची हमी नाही. सद्यस्थितीतसुद्धा शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करण्याचा आणि निर्यात करण्याचा अधिकार आहे. नव्या कायद्यामुळे कंपन्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका आहे. यापूर्वी वेफर तयार करणाऱ्या कंपन्यानी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांशी करार करून आर्थिक फसवणूक केल्याची उदाहरणे आहेत.

काही निर्यातदार कंपन्यानी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतमालाच्या आर्थिक वसुली करण्यासाठी भांडवलदार कंपनीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. सद्यस्थितीत बाजार समित्या शेतकऱ्यांच्या पैशाची हमी घेत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत नाही.

नव्या कायद्यामूळे बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे. बाजार समित्या बंद झाल्यास कंपन्याची मक्तेदारी सुरू होण्याचा धोका आहे. नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा भास निर्माण केला जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

LPG Supply Crisis India : एलपीजीबाबत मोठी अपडेट समोर ! नवीन कनेक्शन्स मिळणार की नाही? सरकारने नेमकं काय सांगितलं...

Jal Jeevan Mission: कोट्यवधींचा जलजीवन मिशन फेल; टाकळी-परिसरात पाणी असूनही ग्रामस्थ तहानलेले

Latest Marathi News Live Update: मालाड पूर्वेत दीराकडून वहिनीच्या घरात चोरी

SCROLL FOR NEXT