All typing institutes in Pune district will be started 
पुणे

टायपिंगची टक टक पुन्हा सुरु !

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्हयातील सर्व टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा‌ मार्ग खुला‌ झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्था सुरू करण्यास‌ परवानगी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील टंकलेखन संस्था उद्यापासून सुरू करता येणार आहेत.

पुणे जिल्हा शासनमान्य संगणक टंकलेखन, मॅन्युअल टंकलेखन व लघुलेखन संस्थांची पुणे जिल्हा संघटना यांनी सुरक्षेचे सर्व निकष पाळून संस्था सुरु करण्यास परवानगी मागितली होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अटी व शर्तींवर ही परवानगी दिली आहे. संस्था‌ सुरू करताना केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. शासकिय वाणिज्य संस्था यांची तालुकानिहाय यादी संबंधित तहसिलदार कार्यालयाकडे सादर करावी लागणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थ्यांची दैनंदिन तपासणी बंधनकारक!

प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य कार्ड तयार करुन शारीरीक तापमान, सर्दी-खोकला यांच्या दैनदिन नोंदी घेण्यात याव्यात. सरावासाठी उपलब्ध हॉलमध्ये प्रत्येक संगणक वा टंकलेखन यंत्रात किमान सात चौरस फुट या प्रमाणात जागेची सोय करावी. विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवही दररोज अद्यावत करावी. संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोईचे होईल, असे आदेशात म्हटले आहे.

जिल्ह्यातील सर्व संस्था सकाळी नऊ ते सायं, पाच वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार यादिवशी सुरू राहतील व रविवारच्या दिवशी सदर संस्था पूर्णतः बंद राहतील. संस्थेत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांचे हात प्रवेशावेळी सॅनिटाईज करावे. साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी. तसेच प्रवेशापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करणे संस्थेला अनिवार्य राहील.

पुण्याच्या चिरागची पुन्हा बाजी! आता JEE Advance मध्ये देशात अव्वल

दोन बॅचमध्ये अर्धा तास अंतर ठेवून प्रत्येक वेळी हॉल स्वच्छ व संगणक वा टंकलेखन सँनीटाईज करावीत. कोरोना साथरोगासंबंधी सर्दी-खोकला, ताप, श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश देता येणार नाही. 

उमेदवाराने शक्यतो हातमोजांचा वापर करावा. मास्क लावणे संस्थांना बंधनकारक करावे लागेल. एकावेळी हॉलमध्ये किमान पाच उमेदवार आणि एक अध्यापकाशिवाय इतरांना प्रवेश देता येणार नाही. विद्यार्थी व त्यांचे पालकांचा दूरध्वनी क्रमांक घेऊन संस्थेला त्यांना नेहमी संपर्क करावा लागेल. स्थानिक उमेदवारांनाच प्रवेश द्यावा, तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबात अथवा निवासस्थान परिसरात कोरोनाचा रुग्ण नसल्याची खात्री संस्थेला करूव घ्यावी लागेल. प्रत्येक संस्थाचालकाने व सर्व विद्यार्थ्यासहित संबंधित सर्वांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधकारक करावे, असे सूचित करण्यात‌ आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात बंधने‌

प्रतिबंध क्षेत्रामधील संस्था सुरू करण्यास परवानगी नसेल. प्रतिबंध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जोपर्यंत त्यांचे क्षेत्र पूर्ववत सुरू होणार नाहीत तो पर्यंत प्रवेश देण्यात येऊ नये. शासन परिपत्रक, आदेश निर्णय व या कार्यालयाचे पत्र व आदेशाचा भंग केल्यास संस्थेस जबाबदार धरुन तात्काळ संस्था सील करण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या‌ सर्व सूचनांचे‌ पालन संस्थाचालक करतील. संस्थेची‌ जागा आणि यंत्रे सॅनिटाइज करूनच कामकाज सुरू केले जाईल. संस्था सुरू करण्याच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.
- हेमंत ढमढेरे (महासचिव, महाराष्ट्र टंकलेखन संस्था)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT