dr Amol Kolhe 
पुणे

बोऱाहडे- शेरकर प्रकरणाबाबत अमोल कोल्हे म्हणतात... 

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर (पुणे) : समाज माध्यमांत प्रसारित होणाऱ्या एकाच बाजूवर मत बनविण्यापेक्षा नाण्याला दुसरी बाजू असू शकते, हा विचार करण्याची आज खरी गरज आहे, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नरमधील बोऱहाडे व शेरकर प्रकरणाबाबत व्यक्त केले आहे.  

विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या कथित आरोपाबाबत अमोल कोल्हे यांनी व्हिडिओद्वारे संदेश दिला आहे. या प्रकरणात शेरकर यांची सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा पोलीस यंत्रणेला सखोल तपास करू द्या. यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, याची मी ग्वाही देतो, असेही त्यानी स्पष्ट केले आहे. 

खासदार कोल्हे म्हणाले, अक्षय बोऱ्हाडे यांचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर मला अनेकांचे फोन आले. कित्येकांनी आपलं मत व्यक्त केलं. अक्षय जे काही सामाजिक कार्य करतो आहे, त्या कार्याविषयी आदर ठेवून मी हे सांगू इच्छितो की, या व्हिडीओमध्ये ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहे, ते शेरकर आणि मी, आम्ही दोघे समाजकारणात येण्यापूर्वीपासूनचे चांगले मित्र आहोत. त्यामुळे शेरकर यांना देखील मी अगदी जवळून ओळखतो. या प्रकरणात जर अन्याय झाला असेल, तर कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न  अजिबात उदभवत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशीची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. 

बोऱ्हाडे यांनी समाज माध्यमावर जो व्हिडिओ प्रसारित केला आहे, ही नाण्याची एक बाजू असू शकते, या नाण्याच्या दुसऱ्या बाजूस स्थानिक, गाव पातळीवर अनेक पदर असू शकतात. मात्र, जर अशा पद्धतीने सोशल माध्यमावर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओच्या आधारे जर आपण आपलं मत बनवायला लागलो, तर या पुढच्या काळात राजकारण, समाजकारण करणाऱ्याच्या कारकिर्दीला डाग लावण्याचा धोका नाकारता येत नाही, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

SCROLL FOR NEXT