Amruta fadnavis 
पुणे

Amruta Fadnavis on Ajit Pawar: अमृता फडणवीसांकडून अजित पवारांचं कौतुक; म्हणाल्या, फडणवीसांचे भाऊ...

यापूर्वी राष्ट्रवादीवर सडकून टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांच्या या विधानामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादीवर सडकून टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांच्या या विधानामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Amruta Fadnavis praises Ajit Pawar said he is only one leader in ncp who worked good)

फडणवीसांचे भाऊ

अजित पवार चोवीस तास काम करतात, कामाप्रती ते समर्पित आहेत. कामाच्याबाबतीत अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांचे भाऊ आहेत. ते राष्ट्रवादीतील एकमेव चांगलं काम करणारे नेते आहेत. सध्या ते या बाजूनं आहेत याचा आनंद आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

प्रत्येकासाठी साकडं घातलं

दरम्यान, "पुण्यातील गणेशोत्सवाबाबत बोलताना फडणवीस म्हणाल्या, खुप आनंद होतोय, महाराष्ट्रात आनंदाच वातावरण आहे. पुण्यात आले आज लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव पुण्यातूनच सुरू केला तिथेच मी एक गाणं म्हणतेय. मी प्रत्येकासाठी साकडं घातलं आहे"

नागपूरकरांच्या फडणवीसांवरील रोषाबाबत म्हणाल्या...

देवेंद्र फडणीस आहेत तिथे छान काम करत आहेत. त्यांनी अजून चांगलं काम करो, शून्यापासून तिथं काम करायला हवं. नागपूरच्या परिस्थितीवर देवेंद्र फडणवीसांचं लक्ष आहे. नागरिकांचा तिथं रोष आहे हे खरंय त्यांना प्रॉब्लेम झालाय ही गोष्टही खरी आहे, पण तिथं नियोजन केलं जात आहे. काही तासात जास्त पाऊस होतो, अशा वेळी काय करायचं? याचं नियोजन केलं पाहिजे अशा शब्दांत पावसाच्या समस्येवरही अमृता फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT