Anganwadi personnel received money from central government but yet not state 
पुणे

अंगणवाडी सेविकांना केंद्राचे पैसे मिळाले, पण राज्याचा पत्ता नाही

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये जाऊन संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अजूनही वेळेवर मानधन मिळत नाही. फेब्रुवारी महिन्याचे निम्मे मानधन केंद्र सरकारकडून मिळाले परंतु राज्य सरकारने त्यांचा हिस्सा न दिल्यामुळे पूर्ण मानधन मिळाले नाही. तर, मार्च महिन्याच्या मानधनाचा अद्याप पत्ता नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण आयुक्त कार्यालयाच्या ढिम्म कारभारामुळे अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत सतत अडचणी निर्माण होत आहेत. अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना वेळेवर मानधन मिळत नाही. तुटपुंज्या मानधनात त्यांच्याकडून अनेक कामे करून घेतली जातात.

Coronavirus : धक्कादायक ! जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना झोपडपट्टी आणि वस्त्यांमध्ये सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. महिन्याला पाच-सात हजार रुपये मानधन घेऊन जीवावर उदार होऊन या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वस्त्यांमध्ये जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण करीत आहेत. असे असताना त्यांना फेब्रुवारी महिन्याचे निम्मेच मानधन मिळाले. तर मार्च महिन्याचे अजूनही मानधन मिळालेले नाही. आयुक्त कार्यालयाकडून कोशागार कार्यालयात फेब्रुवारी महिन्याच्या मानधनाची रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या हातात दमडीही मिळालेली नाही. 

... म्हणून तृतीयपंथीयांनी मानले तहसीलदारांचे आभार

केंद्र सरकारकडून मानधनापोटी 60 टक्के रक्कम वर्ग केली आहे. राज्य सरकारच्या वित्त खात्याकडून 40 टक्के रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे मानधन अर्धवट आले आहे. उर्वरित मानधन नंतर दिले जाईल. तसेच, मार्च महिन्याचे मानधन जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मानधनवाढीच्या फरकाचे बिल कोशागार कार्यालयात मंजुरीला पाठविले आहे, असे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी निलेश दातखिळे यांनी सांगितले.


पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT