Anganwadi workers strike in Pune on internation Women's Day sakal
पुणे

Anganwadi Workers Strike : महिलादिनी अंगणवाडी सेविकांचा पुण्यात मोर्चा

अंगणवाडी सेविका 8 मार्च हा महिलांच्या कौतुकाचा दिवस, लाक्षणिक उपोषण करून आपल्या अन्याय विरुद्ध दाद मागणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंगणवाडीत मदतनीस म्हणून नियुक्तीसाठी दहावी ऐवजी बारावी उत्तीर्ण समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविका पुण्यात महिला दिनी (ता. 8 मार्च) मोर्चा काढणार आहेत. बुधवार (ता. 8) सकाळी 11 वाजता अंगणवाडी सेविका पुण्यातील जिल्हाधिकारी कचेरी समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून काळे वस्त्र किंवा फिती लावून विभागीय उपायुक्त,

महिला बाल विकास, सामाजिक न्याय आयुक्त कार्यालय आवार यांच्या कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र पुणे च्या नेतृत्वाखाली अनवाणी मोर्चा काढतील. तेथे पोहोचल्यावर या मदतीनिस आणि अंगणवाडी सेविका 8 मार्च हा महिलांच्या कौतुकाचा दिवस, लाक्षणिक उपोषण करून आपल्या अन्याय विरुद्ध दाद मागणार आहेत.

पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण इत्यादी द्वारे त्या देशाची भावी पिढी घडवतात. मात्र अतिशय अल्प मानधन देऊन त्यांची बोळवण केली जाते. तसेच विविध निर्णय घेताना त्यांचा न्याय हक्क डावलला जातो.

नुकताच मदतनीस यांना सेविका होण्यासाठी पूर्वी जी इयत्ता दहावीची अट होती. ही बदलून आता बारावी पास करण्यात आली आहे. त्याआधी सेविका पदी नियुक्ती होण्यासाठी अनेक मदतनीसांनी अर्धवट शिक्षण पुन्हा सुरू करून मधल्या वयात दहावी पास चे शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात सेविकांची भरती केली नाही.

मात्र आता 2 फेब्रुवारी2023 रोजी सेविका पदी मदतनिसांच्या थेट नियुक्तीचा आदेश निघाला असून त्यात शिक्षणाची अट बारावी करण्यात आली आहे. यामुळे 15- 20 वर्षे अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मदतनीसांचा भ्रमनिरास झाला असून त्या अतिशय निराश झाल्या आहेत.

असाच अनुभव मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षक पदी भरतीसाठी सेविकेचे वय आता कमाल 45 करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष मुख्य सेविका होण्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि आता वय 45 पुढे गेलेल्या सेविकांचे स्वप्न भंग पावले आहे. म्हणून या अन्याया विरुद्ध येत्या 8 मार्च जागतिक महिला दिन या दिवशी महिला अन्याय विरोधी दिन पाळण्यात येणार आहे.

महिला विकासासाठी स्थापन झालेल्या महिला बालविकास पुणे विभागीय उपायुक्त कार्यालयासमोर सायंकाळी पाच वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र सभेचे निमंत्रक नितीन पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

SCROLL FOR NEXT