Right_To_Education 
पुणे

'आरटीई'ची दुसरी सोडत जाहीर करा, अन्यथा...; मनसे विद्यार्थी संघटनेने दिला इशारा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्ट धोरण निश्चित न केल्याने पालक संभ्रमात आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने त्वरीत पहिली सोडतीतील प्रवेश निश्चिती करावेत आणि दुसरी सोडत लवकरात लवकर जाहीर करावी. अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि कायद्याची लढाई लढल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी निवेनदनाद्वारे दिला आहे.

राज्य सरकारचे सध्याचे धोरण एकंदरीत संभ्रमाचे आणि चिंता वाढवणारे आहे. शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाबाबत गेल्या दोन महिन्यात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १७ मार्च २०२० रोजी पहिली सोडत करण्यात आली खरी, पण त्यानंतर ३१ मार्च २०२० रोजी कागदपत्र पडताळणी करत प्रवेश निश्चित करण्याची मुदत होती. 

परंतु लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर आरटीई प्रवेश प्रक्रिया बारगळली असून आतापर्यंत कुठलाच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने त्वरित पहिल्या सोडततील प्रवेश निश्चितीसाठी यंत्रणा उभी करावी. तसेच दुसरी सोडत तातडीने जाहीर करत रिक्त जागांवरील प्रवेश निश्चितीसाठी धोरण स्पष्ट करून पालकांचा गोंधळ दूर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

"शिक्षण ही कोणत्या एका वर्गाची मक्तेदारी नसून त्यावर समाजातील प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे एक जरी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला तरी मनविसे ते खपवून घेणार नाही. त्यामुळे सरकारने या प्रवेश प्रक्रियेला गती द्यावी,असे यादव यांचे म्हणणे आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road Car Fire : मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कार ज्वालांच्या विळख्यात ; प्रवासी जीव वाचवण्यासाठी पळाले! वाहतूक बंद!

'तारिणी' मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री! कोण आहे तारिणी- केदारची नवीन बॉस? गाजवलीये स्टार प्रवाहची मालिका

Latest Marathi News Update : सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला कोल्हापुरातून पाठिंबा

Mouse अन् Keyboard कोणत्या USB Port मध्ये लावला पाहिजे? 99% लोक करतायत ही चूक, लॅपटॉप-कॉम्प्युटर होऊ शकतो खराब

Panvel: पनवेलमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; १० जणांवर हल्ला, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT