corona
corona 
पुणे

दौंडमध्ये कोरोनाचा कहर, ७ वर्षांच्या चिमुकलीपासून ७० वर्षांच्या आजीला बाधा 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहर व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, आज तब्बल १२ जणांना बाधा झाली आहे. बाधितांमध्ये ७ वर्षाच्या चिमुकलीपासून ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ९४ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार १२ जणांना बाधा झाली आहे. बाधितांमध्ये चार महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

दौंड शहर व परिसरात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या वडार गल्ली येथील ५, एचडीएफसी बॅंक शाखा परिसर- संस्कारनगरी २, तुकाईनगर २, खाटीक गल्ली १, सरपंच वस्ती १ , पासलकर वस्ती (लिंगाळी) १, अशा एकूण १२ जणांना आज कोरोनोची बाधा झाली आहे. दौंड शहरातील तब्बल ४० नागरिकांना १ ते ७ जुलै दरम्यान कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचबरोबर शहरला लागून असलेल्या लिंगाळी व सोनवडी ग्रामपंचायत हद्दीत एकूण ३ जणांना बाधा झाली आहे.  

विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची गरज
दौंड शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहर ६ जुलैपासून पुढील चौदा दिवसांकरिता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शहरात दुचाकी वाहनांवर नागरिक विना मास्क फिरत असून, काही महाभाग तर लहान मुलांना विना मास्क चौकांमध्ये घेऊन येत आहेत. शहरातील विविध भाजी मंड्यांमध्ये शारीरिक अंतराचे पालन होत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT