corona1 
पुणे

 साखळी तुटेल असे वाटत असतानाच शिरूरमध्ये कोरोनाचा उद्रेक

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्याला काल काहिसा दिलासा दिलेल्या कोरोनाने आज पुन्हा उचल खाल्ली. दिवसभरात शिरूर शहरात चार व तालुक्याच्या ग्रामीण भागात १४, असे मिळून १८ कोरोना रूग्ण आढळल्याने शिरूरकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. 

शिरूर शहरात काल दिवसभरात एक व कारेगाव येथे एक, असे दोनच कोरोनाबाधित मिळाल्याने कोरोनाची साखळी तुटल्याचा आशावाद व्यक्त केला जात होता. त्यातच साठपैकी ५९ जणांच्या स्वॅब तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानेही शिरूरकरांना हायसे वाटले होते. परंतु, आज कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने पुन्हा उचल खाल्ली असून, कोरोना संसर्गाने हातपाय पसरल्याचे चित्र आहे. शहरातील भाजीबाजार परिसरात ३३ वर्षीय तरूण, सिद्धार्थनगर येथे २५ वर्षीय महिला, यशवंत कॉलनीतील चाळीस वर्षीय व्यावसायिक आणि सुभाष चौक येथे बाधिताच्या संपर्कात आलेल्या २१ वर्षीय तरूणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी दिली. आजचे सगळे बाधित कमी वयाचे व इतर आजार नसलेले असल्याने 'कव्हर' होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात लागू केलेली दहा दिवसांची टाळेबंदी उद्या (बुधवारी) संपत असताना कोरोना रूग्णांच्या संख्येत मात्र म्हणावी अशी घट झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उद्यापासून व्यवसाय, बाजारपेठ सुरू होत असताना नागरिकांनी आणि विक्रेत्यांनीही पूर्ण खबरदारी पाळावी, शासनाने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. टाळेबंदी उठली असली तरी मास्क न वापरणांरावर, रस्त्यात थुंकणारांवर आणि विनाकारण फिरणारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. बाजारपेठ चालू होत असली, तरी विनाकारणची गर्दी टाळा, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

दरम्यान, तालुक्यातील आठ गावात १४ कोरोनाबाधित रूग्ण सापडले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. यातील धानोरे या छोट्या गावात पाच रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. त्याखालोखाल शिक्रापूर व मांडवगण फराटा येथे प्रत्येकी दोऩ, तर कारेगाव, सणसवाडी, केंदूर व तर्डोबाचीवाडीतील मौर्यपूरम येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. आजच्या बाधित रूग्णांमध्ये बहुतांश कामगार असल्याने औद्योगिक क्षेत्रातील खबरदारीचा व उपाययोजनांच्या कमतरतेचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT