HAVELI 
पुणे

हवेलीकरांनो सावधान, कोरोना वाढतोय झपाट्याने....

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, कुंजीरवाडीसह पूर्व हवेलीत सोमवारी (ता. १३) दिवसभरात कोरोनाचे नव्याने तब्बल २४ रुग्ण आढळून आले आहेत. सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्या नागरीकांबरोबरच विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करूनही पूर्व हवेलीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागही हादरला आहे. 

पूर्व हवेलीत सोमवारी सायंकाळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुंजीरवाडी (६), उरुळी कांचन (५), लोणी काळभोर (४), कदमवाकवस्ती (२), मांजरी बुद्रुक (४), फुरसुंगी (१) व लोणी काळभोर रहिवाशी, पण सध्या मांजरी बुद्रुक हद्दीत वास्वव्यास असेलेले दोन, असे 24 रुग्ण आढळून आल्याची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे, आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी दिली आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ८७ जणांचे स्वॅब (घशातील द्रव) लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधून शनिवारी (ता. ११) तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यांचे रिपोर्ट सोमवारी सायंकाळी आले असून ८७ पैकी २४ जन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा
 
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरातील एकाच कुटुंबातील सहा जण शनिवारी कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले होते. याच कुटुंबातील आणखी दोन सदस्य आजच्या यादीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निस्पन्न झाले आहे. तर, फुरसुंगी हद्दीतील रहिवाशी असले, तरी वावर मात्र कदमवाकवस्ती हद्दीत असलेल्या एका कुंटुबातील तिसरा साठ वर्षीय सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मागिल तीन दिवसांपासून संपूर्ण कुटुंबालाच घेरत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. 

उरुळी कांचनसह कुंजीरवाडी पुन्हा आघाडीवर  
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी नव्याने पाच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या पंचेचाळीसवर पोचली आहे. मागिल आठ दिवसांपासून रोजच उरुळी कांचन हद्दीत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीतील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून उरुळी कांचनची ओळख निर्माण झाली आहे. यात आज कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत एकाच दिवसात सहा रुग्ण आढळून आले. त्यामुळे कुंजीरवाडी हद्दीत पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वीसवर पोचली होती. त्यामुळे उरुळी कांचन पाठोपाठ कुंजीरवाडी पुन्हा आघाडीवर येते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT