Accident News Esakal
पुणे

Accident News : नवले ब्रीजजवळ पुन्हा अपघात, ब्रेक फेल कंटेनरने दिली चार वाहनांना धडक

नवले ब्रिजवर ब्रेक फेल कंटेनरचा थरार

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील कात्रज आंबेगाव येथील नवले पुल परिसरातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. हि घटना काल (शनिवारी सायंकाळी) घडली. कंटेनरचालक पंकज महापात्रे (वय:५७, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळवरून फ्रिज आणि इतर साहित्य घेऊन निघालेल्या कंटेनरचे नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ सेवा रस्त्यावर आल्यानंतर कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यानंतर चौकात असणारे वाहतूक कर्मचारी माधव गोपनर, महेंद्र राऊत, सुशांत यादव या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर रस्त्याने येणारी वाहतूक थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.

मात्र कंटेनर समोर जात असणाऱ्या दोन चारचाकी, एक तीनचाकी रिक्षा व एका दुचाकीला कंटेनरची धडक बसली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून इतर वाहनामधील जखमींना उपचारासाठी परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान हा अपघात संध्याकाळी घडला. यावेळी नऱ्हे रोडवर मोठी गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने एकच हाहाकार उडाला. या अपघातातील एका क्रेटा वाहनाला कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने क्रेटा हवेत उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT