Kirit Somaiya sakal
पुणे

भ्रष्टाचाराच्या यादीत आणखी एक कॅबिनेट मंत्री- सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप, अनिल परब अजूनही मंत्रिमंडळात कसे?

सकाळ डिजिटल टीम

पुणे: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीच्या समुद्रकिनारी असलेले अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यात यावे, याबाबत लोकायुक्तांकडे शपथपत्र दाखल करण्याचे राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करूनही परब मंत्रिमंडळात कसे राहू शकतात? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तर, आता भ्रष्टाचाराच्या यादीत आणखी एक नाव पुढे आले आहे. ती ‘अनिल’ नावाची व्यक्ती कॅबिनेट मंत्री असून, पुढील आठवड्यात ते नाव जाहीर करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला.

येथील पत्रकार भवनात गुरुवारी (ता. ९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार भावना गवळी यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिले आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आणि घोटाळेबाज सरकारला ठिकाणावर आणण्याचे काम सुरूच राहणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला. ठाकरे यांच्या ११ मंत्री आणि नेत्यांची यादी जाहीर केली होती.

बारावा खेळाडू जितेंद्र आव्हाड हे असून, आणखी एक राखीव खेळाडू सापडला आहे. ते नाव पुढील आठवड्यात जाहीर करणार आहे. ती व्यक्ती राज्य सरकारच्या कॅबिनेटमधील असल्याचा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला. छगन भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यावर सोमय्या यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी प्रतिक्रिया दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

खासदार गवळींवर ५५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

खासदार गवळी यांनी २५ कोटी रुपये रिसोड अर्बन सहकारी पतसंस्थेतून रोख काढले आहेत. तरीही ‘इडी’ का चौकशी करते म्हणून विचारले जात आहे. गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी साखर कारखान्यात ५५ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ते म्हणाले,‘४४ कोटी केंद्र सरकारच्या एनसीडीसी आणि ११ कोटी स्टेट बॅंकेकडून घेतले. हा कारखाना सुरू होण्याच्या दिवशी त्यांनी त्यांच्याच भावना ॲग्रो कारखान्याला २५ लाखांत विकला.’

हिंमत असेल तर पवारांनी कागदपत्रे द्यावीत

‘जरंडेश्वर साखर कारखाना ६५ कोटींमध्ये लिलाव करण्याचा आला. हिंमत असेल तर अजित पवार यांनी कारखान्याच्या व्हॅलुएशनचे कागदपत्रे समोर ठेवावीत. काही दिवसांत कारखान्याची ४२ कोटींची जमीन एनएचएआयने आणि त्यानंतर

महावितरणने २२ कोटींची जमीन अधिगृहीत केली. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेसह इतर बॅंकांचे सातशे कोटींचे कर्ज घेतले. तेवढे कर्ज घेण्यासाठी किमान एक हजार कोटींचे असायला हवे’, असे सोमय्या यांनी सांगितले.

तर राणे यांच्यावरही कारवाई करा

सोमय्या यांनी यापूर्वी नारायण राणे यांच्या जुहू येथील अनधिकृत बंगल्याबाबत माहिती बाहेर काढली. तरी त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. त्यावर सोमय्या म्हणाले, भाजपमधील आमच्यापैकी कोणीही चुकीचे काम करीत असेल तर कारवाई करा. हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील असून, ठाकरे यांनी जरूर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.

किरीट सोमय्या म्हणाले...

मी जिवाला घाबरत नाही. पण ज्यांनी घोटाळे केले त्यांना घाबरण्याची गरज काय? बारामतीला गणेश विसर्जनानंतर जाणार आहे. विसर्जनाची प्रक्रिया बारामतीपासून सुरू होणार हे डाकूंचे सरकार, १२ घोटाळे फुल प्रूफ आहे असे सोमय्या म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT