पुणे : कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे हा कारागृहातुन बाहेर आल्यानंतर जंगी मिरवणूक काढताना एका पोलिस अधिकाऱ्यास ढकलून देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मारणेसह त्याच्या दहा साथीदारांविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध आगोदरच कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गजानन पंढरीनाथ मारणे, प्रदीप दत्तात्रय कंधारे, बापू श्रीमंत बागल, आनंता ज्ञानोबा कदम, गणेश नामदेव हुडारे, रुपेश कृष्णराव मारणे, सुनील नामदेव बनसोडे, श्रीकांत संभाजी पवार, सचिन आप्पा ताकवले, संतोष शेलार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडे ते नऊ वाजण्याच्या सुमारास गजा मारणे व त्याचे साथीदार पुणे बंगळूरू महामार्गावरील चांदणी चौकातुन कायद्याचे उल्लंघन करीत, गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्या वाहनांमधून जात होती. त्यावेळी वारजे पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी चांदणी चौकामध्ये गस्त घालत होते. मारणे व त्याचे साथीदार चौकामध्ये आले. त्यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रायकर यांनी वाहनांचा ताफा अडवून त्यांच्याकडे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाहनांची रॅली काढण्यासंदर्भात परवानगी घेतली आहे का ? अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपी संतोष पवार याने त्याच्या वाहनातून हात बाहेर काढून रायकर यांना ढकलून देत, "परवानगी घेतली नाही' असे धमकावित ते तेथून निघून गेले. याबरोबरच सराईत गुन्हेगार गजा मारणे व त्याच्या समर्थक दहशत निर्माण करीत कोथरुडच्या दिशेने निघून गेले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात जमावबंदीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करीत तोंडाला मास्क न लावता कोरोनाचा प्रसार करण्यास मदत केली म्हणून, आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353, 188, 268, 269, 143, 149 या कलमांसह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (बी), साथरोग अधिनीयम 1897 कलम 3, क्रिमीनील लॉ अमेटमेंट कायदा कलम 7, महाराष्ट्र पोलिस अधिनीयम 1951 चे कलम 37 (1), (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
आणखी वाचा - राज्याभिषेक दिन सोहळा शिवस्वराज्य दिन होणार!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.