dead_body 
पुणे

जुन्नरमधील या गावात कोरोनाने आणखी एकाचा मृत्यू

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : पुणे येथे उपचार घेत असलेल्या जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाचे आज सकाळी निधन झाले. त्यामुळे मागील तीन दिवसांत वारुळवाडी येथील दोन जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गामुळे जुन्नर तालुक्यात झालेला हा सहावा मृत्यू आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारूळवाडी येथील दोन्ही व्यक्ती तरुण होत्या. आज मृत्यू झालेली वारूळवाडी येथील व्यक्ती मंचर येथील एका को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. मागील चोवीस तासात
नारायणगाव आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या नारायणगाव, वारुळवाडी, ओझर नवीन गावठाण या गावात प्रत्येकी तीन, धालेवाडी गावात एक, आर्वी गावात चार, असे एकूण चौदा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मागील 25 दिवसांत नारायणगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या नारायणगाव, वारुळवाडी, धनगरवाडी, धालेवाडी, आर्वी, हिवरे बुद्रुक, येडगाव, ओझर परिसरात सुमारे नव्वद कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

हा भाग मार्च ते २० जूनअखेर कोरोनामुक्त होता. मागील पंचवीस दिवसांत या भागांत कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. प्रशासनाला गुंगारा देत मुंबई येथून आलेले नागरिक, लग्न समारंभ, खरेदी, कटींगच्या निमित्ताने एकमेकांच्या सानिध्यात आल्याने या भागात कोरोना संसर्ग वाढला असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाने नारायणगाव, वारुळवाडी परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. मात्र, या भागातील बहुतेक नागरिक अजुनही नियमांचे पालन करत नसल्याने कोरोना संकट दिवसेंदिवस अजुन गडद होण्याचा धोका आहे. 

आपल्या हितासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गुंजाळ, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारुळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे यांनी केले आहे.
 
Edited By : Nilesh J Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

SCROLL FOR NEXT