corona  
पुणे

जुन्नरवर कोरोनाची टांगती तलवार, 28 जणांचे रिपोर्ट...

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक व खामुंडी येथे कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण वाढल्याने तालुक्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 41 वर गेली आहे. त्यातील ३० जण बरे झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, नऊ जण अॅक्टीव्ह आहेत. मात्र, 28 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

बोरी बुद्रुक येथील रुग्ण मुंबईहून आलेला आहे. त्याचे पहिले दोन अहवाल निगेटिव्ह, तर तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील कुटुंबातील सदस्याचा स्वॅब तपासणीस पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यात शुक्रवारी (ता. १९) खामुंडी येथे आढळून आलेल्या चार रुग्णांच्या संपर्कातील तेरा जणांपैकी एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तर मोकासबाग येथील मृत महिलेच्या संपर्कातील १६, अशा एकूण 28 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. जुन्नर, धामणखेल, राजुरी व नवलेवाडी ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ओतूर, कुसुर, बोरी व खामुंडी येथील नऊ जण उपचार घेत असून, ३० जण बरे झाले आहेत, तर औरंगपूर व मोकासबाग येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

जुन्नर तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या ३,९११ पैकी ३९ जण संस्थात्मक, तर ३,८७२ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

जुन्न तालुक्यातील गावनिहाय बरे व मृत्यू झालेले व एक्टिव्ह रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : डिंगोरे- १  (बरा), सावरगाव- ५ (बरे), मांजरवाडी- २ (बरे), पारुंडे- ३ (बरे), आंबेगव्हाण- २ (बरे), धोलवड- ३ (बरे), धालेवाडीतर्फे मिन्हेर- १ (बरा), विठ्ठलवाडी -वडज- १ (बरा), शिरोलीतर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी- १ (बरा), कुरण- १ (बरा), चिंचोली- ३(बरे), ओतूर- १ (बरा), जुन्नर- १ (बरा), राजुरी- १ (बरा), नवलेवाडी- १ (बरा), धामणखेल- १ (बरा). मृत्यू : औंरगपूर- १ (मृत्यू), मोकासबाग- १ (मृत्यू), एक्टिव्ह : ओतूर- १, कुसुर- १, बोरी- २, खामुंडी- 5. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Security Lapse Kolhapur : गुप्तचर यंत्रणा बिनकामाची? अनोळखी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीजवळ, शेतकरी आंदोलकांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत ताफ्यावर ऊस फेकला...

अदाणी समूह RCB चा संघ खरेदी करणार? 'या' चार कंपन्याही आहेत शर्यतीत...

Latest Marathi News Live Update : पदवीधर आमदार धीरज लिंगडे यांच्याकडूनच आदर्श आचारसंहितेचा भंग

'अल्पवयीन विवाहित मुलीशी लैंगिक संबंध म्हणजे बलात्कारच!' High Court चा ऐतिहासिक निर्णय, मुस्लिम वैयक्तिक कायदा फेटाळला

हृतिक रोशनच्या एक्स पत्नी सुझानला मातृशोक ! वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT