corona  
पुणे

मुळशी तालुक्यात असा सुरू आहे कोरोनाचा प्रवास...

गोरख माझीरे

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्यातील कुळे येथील एक 56 वर्षीय पुरुष कोरोनामुळे बाधित सापडला असून, त्याला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

मुळशी तालुक्यातील कोरनाबाधितांची संख्या तीसवर पोचली असून, 23 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात झाली आहे.  

मुळशी तालुक्यातील भूगाव, बावधन, सूस, पिरंगुट, चाले आणि आता कुळे येथे कोरोना रूग्ण सापडल्याने मुळशीकरांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. तालुक्यातील तहसील, पोलिस, आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासन योग्य ती काळजी घेत असूनही हळूहळू एक गाव कोरोना रूग्णाने वाढत चालले आहे. सध्या भूगावात तीन, पिरंगुट, बावधन, कुळे आणि चाले खैरेवाडीमध्ये प्रत्येकी एक, असे सात जण उपचार घेत असून, त्यांची प्रकृतीही ठणठणीत होऊ लागली आहे.  

कुळे येथे सापडलेल्या रूग्णाच्या घरातील सात व उपचार घेत असलेल्या रुग्णालयातील एक, असे एकूण आठ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. रुग्ण राहत असलेला भाग कंटेनमेंट झोन करण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर यांनी दिली.  

मुळशी तालुक्यात पिरंगुटला 3 एप्रिलला तालुक्‍यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी आपापल्या गावात स्वयंघोषित कर्फ्यू पाळला होता. त्यानंतर 16 मे रोजी हिंजवडीत मुंबई संपर्कातील दुसरा रुग्ण सापडला. तेव्हापासून आतापर्यंत महिनाभरात तालुक्‍यात विविध गावात 28 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये लवळ्यातील सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करताना संपर्कात आल्याने दोन डॉक्‍टर आणि आठ नर्स यांना कोरोनाची बाधा झाली, तर जांब्यात 5, सूसमध्ये 2, बावधनमध्ये 2, भूगावला 3, पिरंगुटला 2, हिंजवडीत 3, माण 1 आणि चाले खैरेवाडी येथे 1 व आता कुळे येथे एक, असे एकूण 29 कोरोनारुग्ण आढळून आले. 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT