jejjuri 
पुणे

खंडोबा भक्तांनो, सोमवती यात्रेबाबत घेतलाय हा निर्णय 

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : श्री क्षेत्र जेजुरी येथे येत्या सोमवारी (ता. २०) भरणारी खंडोबाची भर सोमवती यात्राही कोरोनाच्या प्रादुर्भामुळे रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थ,
मानकरी व देवसंस्थान यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, नित्य सेवेकरी, मानकरी यांच्या हस्ते सोमवती स्नानाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत.
त्यासाठी उत्सवमूर्ती थेट मोटारीतून नदीवर घेऊन येणार आहेत. 

सोमवारी अमावस्या आली की जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरते. सोमवारी दिवसभर अमावस्या असल्याने भर सोमवती यात्रेचा योग आहे. मात्र, जेजुरी हे प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने भरसोमवती असूनही यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. धार्मिक विधी व नियोजनाबाबत जेजुरीत बैठक घेण्यात आली. या वेळी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, गणेश आगलावे, छबन कुदळे, जालिंदर खोमणे, रामदास माळवदकर, संजय खोमणे, कृष्णा कुदळे, आबा राऊत, अमोल शिंदे, दिलावर मनेर, नंदू मोरे, काशिनाथ मोरे, अविनाश सातभाई, कुंडलिक दावलकर, सुधीर गोडसे, प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, सहायक पोलिस निरिक्षक अंकुश माने आदी उपस्थित होते.   

पुण्यात पीएमपी वाहतूक सुरू करण्याबाबत महत्त्वाचा आदेश
 
परंपरेनुसार सोमवतीच्या कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान मात्र होणार आहे. प्रमुख सेवेकरी मानकरी यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी होणार आहेत. सोमवारी उत्सवमूर्ती मोटारीतून कऱ्हा नदीवर घेऊन जाणार आहेत. नदी तीरावर सुरक्षित अंतर ठेवून उत्सव मूर्तींना अभिषेक व स्नान घालण्यात येईल. वाहनातूनच उत्सवमूर्तींना आणण्यात येणार आहे. सोमवती नंतर ग्रामस्थ, मानकरी यांना देण्यात येणारा रोजमुराचे (धान्य) या वेळी घरपोच वाटप करण्यात येणार आहे. 

सोमवती अमावस्या उत्सवातील धार्मिक विधींसाठी परवानगी घेण्यात येणार आहे, असेही राजेंद्र पेशवे यांनी सांगितले. प्रशासन व्यवस्थेकडून ज्या सुचनेनुसार व नियम पाळून धार्मिक विधी पार पाडले जातील असल्याचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी सांगितले. धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देवसंस्थानच्यावतीने पुरविण्यात येणार असल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले.

भाविकांनी येण्याचा प्रयत्न करू नये
सोमवती यात्रेला नित्य नियमाने येणाऱ्या भाविकांनी या वेळी जेजुरीत येण्याचा प्रयत्न करू नये. जेजुरी हे कोरोनामुळे प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. मंदिरही बंद असून गडाकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत. त्यामुळे सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी शहरात येण्याचा प्रयत्न करून नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

Edited by : Nilesh Shende
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Commission : कन्फर्म तिकीट होतं, तरी संपूर्ण प्रवास उभ्याने; अखेर रेल्वेलाच मोजावी लागली मोठी किंमत, नेमकं काय घडलं?

Child Drowns in River : वडील पोहत असताना पोटचा गोळा बुडाला, कोल्हापुरातील शिंगणापूर बंधाऱ्यावरील घटना

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात 'या' मालिकेसाठी संधी मिळणार! निवड समितीच्या मिटिंगला नवा T20I कर्णधारही राहणार हजर

IMD Monsoon Update : देवभूमीत आनंदघन अवतरले, महाराष्ट्रासाठीही गूड न्यूज! अरबी समुद्रातील अडथळे दूर, मॉन्सून कोकणात कधी धडकणार?

Kolhapur Accident News : हळू येतो म्हणाले, पण ‘ते’आलेच नाहीत!, उत्तुर घाटात झालेल्या अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं; चातकासारखी वाट पाहणाऱ्या भावाचा आक्रोश

SCROLL FOR NEXT