corona1
corona1 
पुणे

कोरोनाच्या लढाईसाठी जुन्नरकरांकडून मदतीचे हात 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटर येथे आणखी दोनशे रुग्णांची व्यवस्था होऊ शकणार आहे. मात्र, रुग्णांना कॉट, गादी, उशी, बेडशीट, पाणी व इतर आवश्यक बाबी उपलब्ध करण्यासाठी दानशूर व संस्था यांनी पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार जुन्नर शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज एक लाख ४८ हजार ५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.  

जुन्नर तालुक्यात दररोज कोरोना रुग्ण वाढत असून, लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरची क्षमता शंभर बेडची आहे. सध्या येथे ९० पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या वाढत राहिली, तर त्यांच्यासाठी बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, परंतु अहवाल पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांवर लेण्याद्री येथे उपचार करण्यात येत आहे. येथे २२ मे रोजी केंद्र सुरू झाल्यापासून १५६५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी येथे घेण्यात आले. आजअखेर २५४ रुग्ण येथे दाखल झाले. त्यापैकी १३४ जणांनी कोरोनवर मात केली, तर सध्या ९० जण उपचार घेत आहेत. अद्याप १८० अहवाल येणे बाकी असून, रुग्णांनी शंभरी पार केली. त्यांच्या बेडची, पीपीई किट, सॅनिटायझर आदी आवश्यक वस्तूंची लोकसहभागातून उभारणी करण्यात येत असून, त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरसाठी जुन्नर शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज एक लाख ४८ हजार ५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी धनादेश स्वीकारला. लेण्याद्री येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी ५० लोखंडी कॉट, गादी, उशी, बेडशीटसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. असोसिएशनच्या वतीने पहिल्या लॉकडाउनच्या काळात पंधरा दिवस शहरातील १८० गरजूंना दोन वेळचे जेवण दिले होते. तसेच, आळेफाटा येथील डॉ. अनंतराव कणसे होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने २५ कॉट, गादी, उशी, बेडशीट संच देण्यात आले असून, हिवरे येथील एका दानशूर व्यक्तीने २५ पाण्याचे बॉक्स दिले असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम बनकर यांनी दिली.

Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT