lock down 
पुणे

जुन्नर तालुक्‍यातील हा परिसर आता कंटेन्मेंट झोन 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : होम क्वारंटाइन असलेली विवाहिता कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मांजरवाडी (ता. जुन्नर) गाव कंटेन्मेंट झोन म्हणून; तर लगतची खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव ही दोन गावे बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व मांजरवाडीचे सरपंच सूर्यकांत थोरात यांनी दिली. 

खबरदारीचे उपाय म्हणून या गावातील सर्व रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी अत्यावश्‍यक सेवा सोडून कोणतीही व्यावसायिक दुकाने चालू राहणार नाहीत. विनाकारण कोणीही बाहेर पडणार नाही. गावातील व्यक्तींना बाहेर व बाहेरील व्यक्तींना गावात येता येणार नाही. या गावातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा घोडे पाटील यांनी दिला आहे. 

सदर विवाहिता 23 मे रोजी भांडूप (मुंबई) येथून माहेरी आली होती. तिला ताप असल्याने कोरोना तपासणी करण्यात आली होती. या महिलेच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तपासणी अहवाल उद्या प्राप्त होईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT