army chief 
पुणे

लष्करप्रमुख पुणे दौऱ्यावर; नवीन कमांड रुग्णालयाचं केलं उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लष्कराच्या नवीन कमांड रुग्णालयाचे शुक्रवारी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून लष्करी जवान तसेच, माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांस आरोग्यसुविधा पुरविण्याचे कार्य केले जाणार आहे.

लष्करप्रमुख जनरल नरवणे सध्या तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी पुण्यात आले असून शुक्रवारी त्यांनी दक्षिण मुख्यालयाला भेट दिली. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती यांनी जनरल नरवणे यांचे स्वागत केले तसेच, विविध सामरिक आणि प्रशिक्षण संबंधीच्या मुद्द्यांबाबत माहिती दिली.

यावेळी दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी देशात विविध प्रकारच्या मानवतावादी आणि आपत्ती निवारण कार्यात दिलेल्या योगदानाची विशेषतः कोरोना, पूर सारख्या आपत्तीच्या वेळी नागरी प्रशासनाला पुरवलेल्या मदतीबद्दल लष्करप्रमुखांना अवगत करण्यात आले.

सध्याच्या कोरोना काळातही उच्च दर्जाची सज्जता आणि प्रशिक्षण कायम राखल्याबद्दल जनरल नरवणे यांनी मुख्यालयाचे कौतुक केले. तसेच, जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रम आणि कल्याणकारी प्रकल्पांचीही त्यांनी प्रशंसा केली.

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT