Pune_District_Court 
पुणे

पाऊस आला तर थांबायचं कुठं? वकिलांसाठी कोर्टाने केली विशेष व्यवस्था!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच संसर्ग टाळण्यासाठी न्यायालयातील बार रूम, कॅन्टीन आणि वकिलांचे चेंबर सध्या बंद आहेत. त्यामुळे न्यायिक चर्चेसाठी, खटल्याची कागदपत्रे जुळविण्यासाठी आणि पाऊस सुरू झाल्यावर आम्ही थांबायचे कुठे? असा प्रश्‍न वकिलांना पडला होता. मात्र यावर उपाय म्हणून न्यायालयाच्या पॅसेजमध्ये वकिलांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

याबाबतचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयांना दिले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणारी वकिलांची गैरसोय टळली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज बंद होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सध्या सकाळच्या सत्रात तत्काळ प्रकरणांवर सुनावणी होत आहे.

या सर्वांत न्यायालयाच्या आवारात गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी उच्च न्यायालयाने राज्यातील न्यायालयातील बार रूम, कॅन्टीन, वकिलांचे चेंबर बंद ठेवण्याचा तसेच वकिलांना न्यायालयाच्या पोर्चमध्ये थांबण्यास मनाई केली होती. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर न्यायालयात कामकाजासाठी आलेल्या वकिलांपुढे थांबायचे कुठे असा प्रश्‍न पडला होता.

मात्र उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत पुन्हा बदल केल्याने आणि फक्त महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार असल्याने न्यायालयात येणाऱ्या वकिलांची संख्या मर्यादित राहणार आहे. त्यामुळे वकिलांना पॅसेजमध्ये थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केवळ सकाळच्या सत्रात सुनावणी होणार असल्याने न्यायालयात होणारी वकिलांची गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात या वकिलांच्या थांबण्याची, बसण्याची सोय न्यायालयाच्या पॅसेजमध्ये करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आवारात मोठे पॅसेज, बाकडी उपलब्ध असल्याने वकिलांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था करता येऊ शकते. तसेच सामाजिक अंतर देखील पाळले जाईल.
- ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण

Solapur Crime:'विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ'; वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, जन्मठेपेची शिक्षा अन्..

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

SCROLL FOR NEXT