bhigvan 
पुणे

तरुणांकडून लाखो रुपये घेऊन दिले इंडियन नेव्हीचे बनावट नियुक्तीपत्र

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : सैन्यदल व नौदलामध्ये नोकरीचे आमिष दाखवून राज्यभरातील सुशिक्षित बरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या मागे मोठे रॅकट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

या प्रकरणी नितीन तानाजी जाधव (वय ३०, रा. कल्पनानगर, बारामती) व सूत्रधार आकाश काशिनाथ डांगे (वय २५, रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण, जि. सातारा) यांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या प्रकरणी दादा किशोर जाधव (रा. कुरकुंभ, ता. दौंड) यांनी भिगवण 
पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 

आरोपींनी आयएनएस शिवाजी लोणावळा येथे इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीकडून भिगवण व लोणावळा येथे ३ लाख ८० हजार रुपये घेतले व बनावट ई मेलच्या माध्यमातून फिर्यादीस इंडियन नेव्हीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी दादा किशोर जाधव यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानुसार संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. 

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी केली. त्यात सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे मोठे रॅकेट असल्याचे तपासाअंती लक्षात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने नितीन तानाजी जाधव यास बारामती येथुन ताब्यात घेतले व त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सूत्रधार आकाश काशीनाथ डांगे यास फलटण येथून 
ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनी पुणे, सातारा, सांगली, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव व मराठवाडा, विदर्भातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांना मध्यस्थामार्फत इंडीयन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी २ ते ४ लाख याप्रमाणे कोट्यवधी रूपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, महेश चव्हाण, पोलिस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, महेश गायकवाड, नीलेश कदम, उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, संतोष सावंत, अक्षय नवले यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली. या प्रकरणाचा अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने करीत आहेत.

या प्रकरणातील आरोपींनी महाराष्ट्रातील शेकडो तरुणांची फसवणूक केली आहे. गुन्ह्याची व्याप्ती महाराष्ट्रभर असल्यामुळे तपासामध्ये गती यावी, या हेतूने गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपींनी कोणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पाषाण रोड, पुणे यांच्याशी ०२०-२५६५१३५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 - संदीप पाटील, 
पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

IPL 2026 New Rule: आयपीएलने खेळाडूंसाठी आणला नवा नियम! ज्याचं नाव, त्यालाच परवानगी... नव्या नियमाने फ्रँचायझींमध्ये गोंधळ

Latest Marathi News Live Update: मीरा-भाईंदर परिसरातील कचरा आणि मातीचं मिश्रण मुंबईत टाकल्याचा प्रकार

Kirit Somaiya journalists clash : किरीट सोमय्यांची पत्रकारांना थेट दमदाटी, प्रश्न विचारताच भडकले; मुंबईतील घटनेने खळबळ

Pune Politics: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते–भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पुण्यात तासभर चर्चा; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT