पुणे

‘आर्ट ऑफ ५ एलिमेंट्स’च्या लोगोचे अनावरण

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘द आर्ट ऑफ ५ इलिमेंट्स’च्या लोगोचे ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उदय जाधव यांच्या हस्ते दुर्गाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर अनावरण करण्यात आले. लोगोच्या निवडीसाठी आयोजित स्पर्धेत आर्किटेक्ट अमित निगडे यांनी तयार केलेला लोगो निवडला गेला. द आर्ट ऑफ ५ इलिमेंट्स हा ‘स्टुडिओ गाया ३’ व ‘पॉझिव्ह्यू व्हेंचर्स’चा संयुक्त उपक्रम आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पर्धेत निगडे यांच्या ‘मानवाकृती व त्याच्या बाहेर पंचप्राणांची पाच वर्तुळे म्हणजे पंचकोश’ या लोगोला प्रथम क्रमांक मिळाला. या लोगोतील टिंब (डॉट्स) शरीरातील चक्रांमधून वाहणाऱ्या श्वासाचे प्रतिनिधित्त्व करतात. ‘स्टुडिओ गाया ३’च्या गायत्री देशपांडे आर्ट, आर्टिस्ट व विविध कार्यक्रमांचे संयोजन करतील, तर ‘पॉझिव्ह्यू व्हेंचर्स’तर्फे सीए विनीत देव ‘द आर्ट ऑफ ५ एलिमेंट्स’च्या धोरण आणि इनोव्हेशचे संचालक असतील. ते नवे प्रकल्प व सहयोग करारांचे काम पाहतील.

या बाबत बोलताना उदय जाधव म्हणाले, ‘‘द आर्ट ऑफ ५ एलिमेंट्स हा निसर्गदत्त कला लोकांच्या जवळ घेऊन येणारा विशेष उपक्रम असून, तो राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यातून सुरू होऊन पूर्ण राज्यात नेण्यात येणार आहे.’’ संस्थापक गायत्री देशपांडे म्हणाल्या, ‘‘पृथ्वी, पाणी, आग, हवा व अवकाश ही पाच तत्त्वे आपल्या अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करतात. याच तत्त्वांपासून विश्वाची निर्मिती झाली आहे. मनुष्य म्हणून आपल्या अस्तित्वाचा ते अविभाज्य भाग आहेत. त्यामुळेच यापैकी कोणत्याही तत्त्वाच्या सानिध्यात आपल्याला शांतता, स्थिरचित्तता अनुभवायला मिळते. जंगलातून फिरताना, समुद्राची गाज ऐकताना, सुसाट वाऱ्याचा आवाज ऐकताना, सूर्याची उबदार किरणे अंगावर घेताना, आकाशाकडे पाहिल्यावर अवकाशाचा अंदाज घेताना ही पाच तत्त्वे आपल्या अस्तित्त्वासाठी का आवश्यक आहेत, हेच समजते.

‘आर्ट ऑफ ५ एलिमेंट्स’मध्ये आमचा उद्देश या तत्त्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कला लोकांच्या जवळ नेणे व त्यांना त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात शांतता मिळून देणे, हाच आहे. आम्ही कलाकारांना एकत्र आणून त्यांची प्रदर्शने, लेख आणि ब्लॉगचे लेखन व ५ इलिमेंट्स संदर्भातील मल्टिमीडिया प्रकल्प तयार करून व त्यांद्वारे जगभरातील लोकांना या तत्त्वांचे महत्त्व पटवून देऊ.’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT